वणीजवळ अपघातात ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:27 AM2019-05-21T01:27:12+5:302019-05-21T01:27:29+5:30

सप्तशृंगगडावर देवीचा नवसपूर्तीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कृष्णगाव शिवारात आयशर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात होऊन चार भाविक ठार, तर २५ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली.

 Four killed in road accident | वणीजवळ अपघातात ४ ठार

वणीजवळ अपघातात ४ ठार

Next

पंचवटी /वणी : सप्तशृंगगडावर देवीचा नवसपूर्तीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कृष्णगाव शिवारात आयशर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात होऊन चार भाविक ठार, तर २५ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली.
रविवारी पंचवटीतील काही भाविक सप्तशृंगगडावर नवसपूर्तीच्या धार्मिक विधीसाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा नाशिकला परतत असताना वणीजवळ कृष्णगाव शिवारात या भाविकांच्या आयशर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. यावेळी चालकाने आयशर ट्रक रस्त्यात असलेल्या गतिरोधकाजवळ थांबविली; मात्र काही भाविक खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने (एमएच १५ एव्ही १९५५) त्यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आयशर वाहन सुमारे २५ फूट पुढे जाऊन रस्त्याच्याकडेला उलटले. या धडकेत चार भाविक जागीच ठार झाले, तर इतर वीस ते पंचवीस भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुष, महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचालकाने वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी फरार ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अपघाताची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहायक निरीक्षक प्रवीण पाडवी, उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.
जखमींवर वणी रुग्णालयात उपचार
अपघातात ठार झालेल्या चौघांपैकी तिघे युवक हे पंचवटीतील पेठरोड येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर अशोक ठाकूर (२३), कुणाल कैलास ठाकूर (२५), गणेश भगवतीप्रसाद ठाकूर (३०) व त्र्यंबकेश्वर येथील आशिष माणिक ठाकूर (३०) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना
वणी येथील ग्रामीण रु ग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title:  Four killed in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.