मालेगावजवळ तिहेरी अपघातात चार ठार
By Admin | Published: June 30, 2017 01:03 AM2017-06-30T01:03:31+5:302017-06-30T01:04:41+5:30
ंमालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पाटणे शिवारात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात धुळे येथील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पाटणे शिवारात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात धुळे येथील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मायलेक व दोघा सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी ४ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. डॉ. प्राची चिंतन दवे (३१), मयूर चिंतन दवे (१० महिने), ऋची मयूर शाह (२७) सर्व रा. अग्रवालनगर, धुळे, चालक रफीक रसूल शेख (३५) ही अपघातातील मृतांची नावे आहेत, तर या अपघातात चिंतन दवे (३२) हे जखमी झाले आहेत. नाशिक येथून कामकाज आटोपून दवे कुटुंबीय धुळ्याकडे येत होते. तालुक्यातील पाटणे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील गतिरोधकजवळ हा भीषण अपघात घडला. धुळ्याकडे जात असताना पाटणे फाट्यावर पुढे चालणाऱ्या कार (क्र. एमएच १८ व्ही ८८) हिच्यावर त्यांची कार (क्र. एमएच १८ एजे ०४३५) आदळण्याच्या प्रयत्नात होती.
यावेळी कारचालक रफीक शेख यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढील कारवर आदळू नये म्हणून त्यांनी ब्रेक मारला. यावेळी गाडी रस्त्यावरच उलटली. पाठीमागून येणाऱ्या कन्टेनरने त्यांच्या कारणे जोरदार आदळल्यामुळे स्विफ्ट कारमधील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला.
प्राची व मयूर हे मायलेक तर प्राची व रुची या सख्ख्या बहिणी होत्या. रुग्णालयातील कामकाज आटोपल्यानंतर काळाने दवे कुटुंबीयांवर घाला घातला.