जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:40 AM2019-11-01T01:40:40+5:302019-11-01T01:41:07+5:30

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Four lakh farmers in the district are affected | जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

Next

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांच्या शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, यामध्ये दुसºयांदा पिके वाया जाणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. पेठ तालुका वगळता १६२१ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत.
आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने सात तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालावरून या पावसामुळे मालेगाव तालुक्यातील १५० गावे बाधित झाली आहेत, तर बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ८१,१६९ इतकी आहे.
सटाणा तालुक्यातील २३५ गावांमधील ५४,२१२, नांदगाव तालुक्यात १०० गावांतील ३७,५१३, कळवणमधील १५० गावांतून ३०,२४१, दिंडोरीतील १०५ गावांमधून ८,२४०, देवळा येथील ४६ गावे बाधित झाली आहेत, तर नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या २६,५८९ इतकी आहे. सुरगाणा येथील ६ गावांमधील ४६ शेतकरी, नाशिक तालुक्यातील ७७ गावांमधील अंदाजे ५ हजार शेतकरी, इगतपुरीतील १२७ गावांमधून १५४१, त्र्यंबकेश्वरला बाधित झालेल्या १२५ गावांमधील १३,५७०, निफाड १३६ गावांमधील ६२,६८५, चांदवड तालुक्यातील ११२ गावांमधील ५८,५६१, येवला येथील १२४ गावांमधून २९,२३४ तर सिन्नरमधील १२८ गावांतील ४८,३३० शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित झालेल्या शेतकºयांची संख्या ४ लाख ५६ हजार ९३१ इतकी असल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.
क्यार वादळामुळे महाराष्टÑात आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने बदललेल्या वातावरणाचा फटका शेतपिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
आॅक्टोबरमध्ये पाऊस परतीला लागत असल्यामुळे त्यादृष्टीने शेतकºयांकडून पिकांचे नियोजन केले जाते; परंतु लहरी वातावरणामुळे शेतकºयांचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडले
आणि आॅक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे तर शेतकºयांचे कंबरडे मोडले
आहे.
शेतातील पिकांचे नुकसान झालेच शिवाय काढणीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टरवर द्राक्षबागा, ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन, २.२५ लाख हेक्टरवरील मका, तसेच काही हजार हेक्टरवर बाजरी पीक घेण्यात आले आहे. या पिकांसह भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Four lakh farmers in the district are affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर