सावळ घाटात चार लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 11:01 PM2020-10-17T23:01:41+5:302020-10-18T00:18:56+5:30
पेठ : गुजरात राज्यातील महाराष्टÑात प्रतिबंधित असलेला चार लाखांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
पेठ : गुजरात राज्यातील महाराष्टÑात प्रतिबंधित असलेला चार लाखांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. दादरा नगर-हवेली या केंद्र्रशासित प्रदेशातील मद्यसाठा गुजरात राष्टÑीय महामार्गावर पेठ तालुक्यातील सावळ घाटात सापळा रचून पकडला. वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनामध्ये (जीजे ०६ एचएल-९६५५) विशिष्ट कप्पा तयार करून त्यात मद्याच्या बाटल्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संशयित दिलीपभाई मोतीसिंगभाई वसावा (३३, रा. टेकडा, ता. झगडीया जि. भरूच) यास ताब्यात घेतले आहे. पथकाने वाहनासह ४ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-----------------------------
पेठ तालुक्यातील सावळ घाट येथे जप्त केलेला अवैध मद्यसाठ्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी. (१७ पेठ २)