साठेखताद्वारे साडेचार लाखांची फसवणूक
By admin | Published: June 24, 2017 05:53 PM2017-06-24T17:53:33+5:302017-06-24T17:53:33+5:30
मिळकत मालकास साडेचार लाख रुपये देऊन केलेल्या साठेखतानंतर खरेदीखत देणे करून अपेक्षित असताना मूळ मालकाने महापालिकेकडे बांधकाम परवानगी मागून खरेदीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मिळकत मालकास साडेचार लाख रुपये देऊन केलेल्या साठेखतानंतर खरेदीखत देणे करून अपेक्षित असताना मूळ मालकाने महापालिकेकडे बांधकाम परवानगी मागून खरेदीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
रवींद्रकुमार गौरीशंकर (४४, भावगंगा सोसायटी, आनंदनगर, कामटवाडे, नाशिक) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अरविंद अंबादास कुलाल, अजय अरविंद कुलाल व राजेंद्र शांतीलाल कलखबर (रा़ रुक्मिणी अपार्टमेंट, गंगापूररोड) यांच्याकडून २००२ मध्ये मिळकत खरेदी केली़ या खरेदीपोटी गौरीशंकर यांनी संशयितांकडून साठेखत करून घेऊन २० आॅगस्ट २००२ ते २० जून २०१७ या कालावधीत ४ लाख ४१ हजार रुपये धनादेश तसेच रोख स्वरूपात दिले़ मात्र संशयितांनी या मिळकतीची खरेदी न देता महापालिकेकडून बांधकाम करण्याची परवानगी मिळवली़ तसेच खरेदीखत करून न देता त्यासाठी अधिक पैशांची मागणी करून फसवणूक केल्याचे गौरीशंकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बाप-लेकांसह तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़