दोन महिन्यात चार बिबटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 09:30 PM2020-07-02T21:30:24+5:302020-07-02T22:55:55+5:30
सिन्नर : येथील वनविभागाने दोन महिन्यात चार बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले असले तरी बिबट्यांचा वावर कायम असल्याने दहशत कायम आहे. तालुक्यात नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर कायम आहे. त्यामुळे पाथरे, नळवाडी, सिन्नर, विंचूरदळवी येथे पुन्हा पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतीकामे करणे अवघड झाले आहे.

वनविभागाने दोन महिन्यात चार बिबट्यांना जेरबंद केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पाच गावांत बिबट्यांचा वावर कायम आहे. नळवाडी, नांदूरशिंगोटे, आडवाडी, विंचूरदळवी या गावात बिबट्यांचा शेतकऱ्यांना उपद्रव सोसावा लागत होता. पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत होते. त्यानंतर वनविभागाने चारही ठिकाणी पिंजरे लावले होते. त्यात विंचूरदळवी येथे पूर्ण वाढ झालेला आठ वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला़पंधरा दिवसांपूर्वीच मोह शिवारात महामार्गालगत भरदिवसा बिबट्या दिसून आला. सरदवाडीजवळ बायपास मार्गावर तीन दिवसांपूर्वीच बिबट्याचे दर्शन झाले. हा भाग उपनगरांत लगत असल्याने रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.