डोंगरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:53 PM2019-12-03T18:53:15+5:302019-12-03T18:53:27+5:30
निधीची लूट : अपर जिल्हधिकाऱ्यांनी दिला निकाल
येवला : तालुक्यातील डोंगरगांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी अपात्र घोषित केले आहे. डोंगरगावचे ग्रामस्थ रंजक दौलत ढोकळे यांच्या तक्र ार अर्जावरु न ग्रामपंचायत सदस्य बाबुराव गजानन सोमासे, विजय साहेबराव मोहन, श्रीमती रु पाली केशव पगारे, सौ. शिल्पा पोपट सोमवंशी हे चार सदस्य अपात्र ठरले आहेत. यामुळे शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी मनमानी पद्धतीने लुटणा-या गाव पुढाऱ्यांना चाप बसला आहे.
डोंगरगांव येथील ग्रामस्थ रंजक दौलत ढोकळे यांनी वरील चार सदस्यांविरु द्ध दिनांक ११ डिसेंबर २०१८ रोजी नाशिकच्या जिल्हाधिका-यांकडे तक्र ार अर्ज दाखल केला होता. सदर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करून स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबियांचा लाभ करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. जिल्हाधिका-यांनी सदर प्रकरण अपर जिल्हाधिका-यांकडे वर्ग केले होते.येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सदर तक्रारीची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते, त्यानुसार गट विकास अधिका-यांनी १३ मार्च २०१९ रोजी अहवाल सादर केला. अपर जिल्हाधिका-यांकडे सुनावणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी यांनी अर्जदार व सामनेवाले यांना आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देवूनही त्यांनी कोणताही युक्तिवाद केला नाही. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रे पाहून गुणवत्तेवर निर्णय घेण्यात आला. संबंधित सदस्यांनी जाणूनबुजून ग्रामपंचायत कामकाजात स्वत: चा व कुटुंबीयांचा आर्थिक लाभ घेतल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ग) चा भंग केल्याने कायद्यातील तरतुदीनुसार या चारही सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद उर्विरत कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या निकालामुळे तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे.