खेडगाव येथे पुन्हा चार रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:12 PM2020-07-27T20:12:54+5:302020-07-27T20:13:57+5:30

दिंडोरी : तालुक्यात दररोज कोरोना रु ग्णांची संख्या वाढतच असून खेडगाव येथे चार रु ग्णांची भर पडली आहे, तर वणी येथील एक रु ग्णांचा मृत्यू होत बळींची संख्या आठ झाली आहे.

Four more at Khedgaon | खेडगाव येथे पुन्हा चार रु ग्ण

खेडगाव येथे पुन्हा चार रु ग्ण

Next
ठळक मुद्देवणीत एक रु ग्णांचा मृत्यू

दिंडोरी : तालुक्यात दररोज कोरोना रु ग्णांची संख्या वाढतच असून खेडगाव येथे चार रु ग्णांची भर पडली आहे, तर वणी येथील एक रु ग्णांचा मृत्यू होत बळींची संख्या आठ झाली आहे.
सोमवारी एकूण २६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेत, त्यात खेडगाव येथील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यात खेडगाव येथील दोन पुरु ष, व महिला असे कुटुंबातील ४ व्यक्तींचा समावेश आहे. इतर २२ व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. खेडगाव येथे वाढत असलेल्या रु ग्ण संख्येमुळे तालुका प्रशासनाने तातडीने बैठक घेत सर्वेक्षण सुरू केले आहे. ग्रामस्थांनी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वणी येथील ५० वर्षीय इसमाचा रविवारी (दि.२६)मृत्यू झाला असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

औद्योगिक क्षेत्रात रु ग्णसंख्या अधिक असल्याची चर्चा
तालुक्यातील लखमापूर येथील एक कंपनीत २ रु ग्ण आढळले असल्याचे तालुका यंत्रणेने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. मात्र ही संख्या अधिक असून इतरही लखमापूर,अवनखेड व पालखेड येथील तीन कंपन्यांमध्ये रु ग्ण आढळल्याची चर्चा औद्योगिक क्षेत्रात आहे. मात्र तालुका यंत्रणेकडे दिंडोरी येथील दोन रहिवासी कामगारांची नोंद झाली आहे.
तालुका प्रशासनाने याबाबत सर्व कंपन्यांना पत्र देत आपल्या कंपनीतील कुठेही वास्तव्यास असलेले कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबातील कुणी रु ग्ण आढळल्यास त्वरीत तालुका आरोग्य अधिकारी यांना कळवावे योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Four more at Khedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.