देवळा तालुक्यात चार रु ग्ण करोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 08:46 PM2020-06-30T20:46:44+5:302020-06-30T22:51:33+5:30
देवळा : रविवारी(दि.२८) देवळा शहरातील ३८ वर्षीय तरु णाचा तसेच खुंटेवाडी येथील १३ वर्षीय मुलाचा अहवाल बाधित निघाल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) गुंजाळवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाअहवाल बाधित आला असून तो व्यावसायिक असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. तर त्या दोन रु ग्णांच्या सहवासात आलेल्या १३ पैकी सात जणांचे अहवाल सायंकाळी प्राप्त झाले, त्यानुसार आणखी ३ जण पॉझिटिव्ह व ४ निगेटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

उर्वरित ६ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, याआधीच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तीन दिवस जनता कर्फ्यू लावला होता. महिनाभरापूर्वी तालुक्यातील मेशी येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दि. २० मे रोजी कामानिमित्त मुंबई येथे राहत असलेला तालुक्यातील दहिवड येथील २८ वर्षीय तरु ण मूळ गावी आल्यावर त्याचा अहवाल बाधित आला. त्या नंतर त्याच्या संपर्कातील अन्य एका व्यक्तीचा अहवाल देखील पॉझिटिव आला होता.
आता (दि.२८) पुन्हा तालुक्यातील दोघांचा करोना अहवाल बाधित आढळल्यानंतर मंगळवारी (दि.३०) गुंजाळवाडी येथील ४५ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल बाधित आल्याने खळबळ उडाली आहे. सदर रु ग्ण हा व्यावसायिक असून दोन दिवसांपूर्वी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिकच्या खासगी रु ग्णालयात दाखल केले होते. तो बाधित आढळून आला. याआधीच्या दोन रु ग्णांच्या संपर्कातील एकूण १३ जणांचे प्रशासनाने विलगीकरण केले आहे. या १३ पैकी ७ अहवाल सायंकाळी प्राप्त झाले असून त्यातील ३ जण पॉझिटिव्ह व ४ जण निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. देवळा शहर व तालुक्यात आतापर्यंत बधितांची संख्या ही सहावर पोहोचली आहे. उर्वरीत ६ जणांचा अहवाल अद्याप आलेला नाही.
दरम्यान, त्या तीन जणांचे वास्तव्य असलेला निम गल्ली, शारदा देवी विद्यालय परिसर कंटेन्मेंट व बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मंगळवारीआढळून आलेल्या रु ग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींची आरोग्य तपासणी करून विलगीकरण करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.