देवळा तालुक्यात चार जण होम कोरोंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:33 PM2020-04-10T20:33:16+5:302020-04-10T20:35:41+5:30

देवळा : चांदवड येथे कोरोनाबाधित रु ग्ण सापडल्यानंतर दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या देवळा तालुक्यातील चार व्यक्ती होम कोरोंटाईन करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.

Four people are home quarantine in Deola taluka | देवळा तालुक्यात चार जण होम कोरोंटाईन

देवळा तालुक्यात चार जण होम कोरोंटाईन

Next
ठळक मुद्दे हे चार जण टोल नाक्यावर कर्मचारी आहेत.

देवळा : चांदवड येथे कोरोनाबाधित रु ग्ण सापडल्यानंतर दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या देवळा तालुक्यातील चार व्यक्ती होम कोरोंटाईन करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.
चांदवड तालुक्यात एका टोलनाक्यावरील कर्मचारी कोरोना संक्रमीत असल्याचे आढळून आल्यानंतर देवळा तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला. देवळा तालुक्यातील चार व्यक्ती हया कोरोना संक्रमीत व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. हे चार जण टोल नाक्यावर कर्मचारी आहेत.
याबाबत माहीती मिळाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत या सर्वांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यात कोरोनाची कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळून आली नाहीत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्यावर हातावर शिक्का मारून १४ दिवसांसाठी त्यांना होम कोरोंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य विभाग त्यांचेवर लक्ष ठेवून आहे. तालुक्यातील चिंचवे, भावडे, खालप व देवळा गावातील हे चार जण असल्याची माहिती डॉ. मांडगे यांनी दिली आहे.
चारही व्यवतींची तपासणी केली असता त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. दक्षता म्हणून त्या सर्वांना १४ दिवस होम कोरोंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. नागरीकांनी योग्य ती काळजी घ्यावी व शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करावे.
- डॉ. सुभाष मांडके, तालुका आरोग्य अधिकारी, देवळा.
मालेगाव व चांदवड येथे कोरोना संक्रमीत रु ग्ण सापडल्यामुळे दक्षता म्हणून देवळा नगरपंचायतीने शहरात अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेले किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मास विक्र ीची दुकाने १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत वैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
- संदीप भोळे, मुख्याधिकारी, देवळा नगरपंचायत.

Web Title: Four people are home quarantine in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.