युवकाच्या खूनप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 23:52 IST2021-11-08T23:51:24+5:302021-11-08T23:52:10+5:30
मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावर प्रेयसीच्या डोळ्यांसमोर प्रियकराला चाकूने सपासप वार करून चार आरोपी नंदीग्राम एक्स्प्रेसने कल्याणकडे फरार झाले होते. या प्रकरणी मयत युवकाच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवकाच्या खूनप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावर प्रेयसीच्या डोळ्यांसमोर प्रियकराला चाकूने सपासप वार करून चार आरोपी नंदीग्राम एक्स्प्रेसने कल्याणकडे फरार झाले होते. या प्रकरणी मयत युवकाच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐन दिवाळीत मनमाड रेल्वेस्थानकावर चांदवड तालुक्यातील उसवड या गावी राहणारा शिवम संजय पवार या युवकाची शुक्रवारी (दि.६) हत्या करण्यात आली होती. ही हत्या इन्स्टाग्रामवर फेक आयडी करून अश्लील फोटो टाकल्याचा राग आणि प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथे राहणाऱ्या मनीषा नावाच्या तरुणीसोबत मोबाइलच्या इन्स्टाग्रामवरून शिवमची ओळख झाली होती. या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात असताना आपली प्रेयसी तिच्या तीन मित्रांसोबत फिरते, फोनवर बोलते आणि मेसेजवर चाट करत असल्याचा राग शिवमच्या मनात होता. या संशयावरून शिवमचे या तिघांमधील एकासोबत आणि आपल्या प्रेयसीशी फोनवर जोरदार भांडण झाले. तू आमच्यासोबत कामावर राहते, त्यामुळे शिवमने त्याचा राग धरून आमच्या इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार केला. आम्हाला बदनाम करतो आहे. त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी त्याला इकडे बोलावून घेण्याचे मनीषाला सांगितले. मात्र, शिवमला कल्याणला बोलावले असता त्यानेच या सर्वांना मनमाडला बोलावून घेतले. त्यानुसार, शिवमची प्रेयसी मनीषा तिचे मित्र चेतन, मोहित, नील आणि मयूर असे पाच जण कल्याण स्टेशनवरून मनमाडला आले. रेल्वेस्थानकावर शिवमचे या चार जणांसोबत भांडण झाले. त्याचा राग येऊन शिवमला चाकूने भोसकून सपासप वार करून ते चारही जण धावती गाडी पकडून पसार झाले होते.
या प्रकरणी मयत युवकाच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.