चार विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:36 AM2019-03-24T00:36:07+5:302019-03-24T00:36:28+5:30

शहरातील भोसला गर्ल्स हायस्कूलमध्ये अठरा दिवसांपूर्वीच नियुक्त झालेल्या सहायक प्रशिक्षक सेवानिवृत्त सुभेदार मच्छिंद्र कर्पे याने चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२३) रात्री उशिरा उघडकीस आला.

Four students arrested for molesting a trainer | चार विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला अटक

चार विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला अटक

Next

नाशिक : शहरातील भोसला गर्ल्स हायस्कूलमध्ये अठरा दिवसांपूर्वीच नियुक्त झालेल्या सहायक प्रशिक्षक सेवानिवृत्त सुभेदार मच्छिंद्र कर्पे याने चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२३) रात्री उशिरा उघडकीस आला. याप्रकरणी संशयित कर्पे यास संस्थेने नोकरीवरून काढून टाकले असून, पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसलाच्या गर्ल्स हायस्कू लमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग चालतात. या शाळेत मुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी मेजर, सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाते. त्यानुसार १५ फेब्रुवारी रोजी कर्पे यास संस्थेने सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मुलाखतीदरम्यान, त्यांना संस्थेने सर्व नियम समजावून सांगितल्याचा दावा विश्वस्तांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने भोसला सैनिकी शिक्षण संस्थेला हादरा बसला आहे. अल्पवयीन मुलींनी घरी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पालकांनी येथील मुख्याध्यापकांच्या सदर प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
घडलेली घटना अत्यंत निंदनीय अशीच आहे. चार दिवसांपुर्वी हा प्रकार घडला त्यानंतर पालकांनी ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली. जेव्हा हा प्रकार आमच्यापर्यंत पोहचला तेव्हा तत्काळ ‘विशाखा’ समितीच्या महिला सदस्यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत चौकशी सुरू केली. शनिवारी रात्री ८ वाजता चौकशी पूर्ण झाली व कर्पे हा चौकशीत दोषी आढळला. तत्काळ गंगापूर पोलिसांना माहिती देऊन कर्पे यास पोलिसांच्या स्वाधीन केले. संस्थेने या प्रकारामध्ये कुठलाही पक्षपातीपणा केला नसून निपक्ष चौकशी करत न्याय दिला. अशा पद्धतीचे वर्तन करणाऱ्यांच्या संस्था कधीही पाठीशी राहणार नाही, पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.  - डॉ. दिलीप बेलगावकर, सरकार्यवाह

Web Title: Four students arrested for molesting a trainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.