नँशनल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड,सिल्हर मेडल प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:36 PM2019-01-20T18:36:39+5:302019-01-20T18:37:09+5:30
नामपूर : नामपूर सारख्या ग्रामिण भागातिल आठ वर्ष वयोगटातिल लहानग्या बालगोपालांनी हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यापातळीवरील शहरात नॅशनल लेव्हल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड व सिल्हर मेडल प्राप्त करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. स्पर्धेत दक्ष बागूल या विद्यार्थांने गोल्डन मेड
नामपूर : नामपूर सारख्या ग्रामिण भागातिल आठ वर्ष वयोगटातिल लहानग्या बालगोपालांनी हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यापातळीवरील शहरात नॅशनल लेव्हल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड व सिल्हर मेडल प्राप्त करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
स्पर्धेत दक्ष बागूल या विद्यार्थांने गोल्डन मेडल मिळवून प्रथम क्र मांक मिळवला. तर सिल्हर मेडलसाठी कुंतल खिवसरा, फाल्गुन सावंत व स्वराज कोकणे हे पात्र ठरलेत.
या स्पर्धेत उत्तराखंड, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, केरळ, हरियाना, गुजराथ, उत्तर प्रदेश आदि राज्यातून १८७ विद्यार्थांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा नॅशनल रोलर स्केटिंग आसोशिएशन आँफ इंडिया यांनी आयोजित केली होती. श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने स्नेहलता नेरकर यांनी गौरव केला.
(फोटा २० नामपूर)
स्केटिंग स्पर्धेत यशवंत विद्यार्थाचा गौरव. विद्यार्थी पालक प्रविण सावंत व स्नेहलता नेरकर.