नाशिक शहर परिसरात विविध घटनांमध्ये चौघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:59 AM2018-10-20T00:59:33+5:302018-10-20T01:12:54+5:30
शहर परिसरात चार विविध घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
नाशिक : शहर परिसरात चार विविध घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ जेलरोड परिसरातील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरती सुनील निमराणी (३२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ नाशिकरोडच्या रमाबाई आंबेडकरनगरमधील इसमाने बुधवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली़ रवींद्र नारायण धोंगडे (३०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ शीतल किशोर पालवे (वय २३, रा. राहुरी, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील शुभम पार्क येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़१८) सायंकाळच्या सुमारास घडली़ विशाल दिनकर मोरे (१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळले नसून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
एकलहरा येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून सासू व नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकलहरा येथील विवाहिता आरती पंकज भडांगे हिने रेल्वे रुळावर रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. याबाबत ओझर राजवाडा येथील विकास बकाजी बागुल यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आपली मुलगी आरती हिचा विवाहाच्या काही महिन्यांनंतर सासू उषाबाई विक्रांत भडांगे यांनी आरतीने नोकरी करावी म्हणून मागे लागली होती. शासकीय नोकरी मिळत नसल्याने आरती हिने खासगी नोकरी स्वीकारली होती. त्यामुळे सासू उषाबाई ही सतत आरती हिला आडूनपाडून बोलत मानसिक व शारीरिक त्रास देत होती.
यावेळी पती पंकज विक्रांत भडांगे, आरती हिला होणाºया त्रासास कुठलाही विरोध करत नव्हता. तसेच आरतीशी अबोला धरून तिला नैराश्याच्या गर्तेत ढकलून दिले. विवाहिता आरती हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू उषाबाई भडांगे, पती पंकज भडांगे ( रा. ऐश्वर्या रोहाउस, एक नंबर चेमरी एकलहरारोड) यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.