चौघा चोरट्यांना पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 01:57 AM2022-06-30T01:57:12+5:302022-06-30T01:57:49+5:30

सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघा संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून घोरवड घाटात पकडले. त्यानंतर, या चौघा संशयितांना सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Four thieves were chased and caught | चौघा चोरट्यांना पाठलाग करून पकडले

सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील ग्रामस्थांनी चार संशयित चोरट्यांना पकडल्यानंतर घटनास्थळी सिन्नर पोलिसांना पाचारण करून त्यांना ताब्यात देण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देथरार : ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न, विंचूरदळवी येथील घटना

सिन्नर: तालुक्यातील विंचूरदळवी येथे ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघा संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून घोरवड घाटात पकडले. त्यानंतर, या चौघा संशयितांना सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विंचूरदळवी-पांढुर्ली रस्त्यावरील भोर मळा येथे बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयित चोरट्यांनी सुरुवातीला चोरट्यांनी विंचूरदळवी गावाजवळील कानडे मळा येथील कल्पेश कानडे यांच्या ट्रॅक्टरचे फाळके चोरले. त्यानंतर, त्यांनी आपला मोर्चा भोर मळा येथे वळविला. या ठिकाणी ट्रॅक्टरजवळ अचानक आवाज आला. घराच्या खिडकीजवळच झोपलेल्या दत्तू रामा भोर यांना जाग आली. त्यांनी घराच्या बाहेर धाव घेत आरडाओरड केली. भोर यांनी घरातील सर्वांना जागे केले, तेव्हा चोरट्यांनी चोरलेल्या काही वस्तू जागेवर टाकून पळ काढला.

भोर यांनी घरातील व शेजारच्यांच्या मदतीने पाठलाग करून चोरांना घोरवड घाटाजवळ पकडले. ग्रामस्थांना संशयित चोरट्यांना चोरीने बांधून ठेवले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले.

या घटनेत अर्जुन सूरज रोही (२०), आदित्य सुधीर सौदे (१८), अनिकेत अनिल उमाप (२०) व जुबेर रुस्तम खान (२०) सर्व रा.भगूर या संशयितांना सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ शिरोळे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Four thieves were chased and caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.