चार हजार क्युसेकने झेपावले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:22+5:302021-09-14T04:18:22+5:30

नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात ...

Four thousand cusecs of water | चार हजार क्युसेकने झेपावले पाणी

चार हजार क्युसेकने झेपावले पाणी

Next

नाशिक: गंगापूर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोमवारी सुमारे चार हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी नदीत प्रवाहित करण्यात आल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ९७ टक्के इतके भरले आहे. पावसाचा जोर सायंकाळी ओसरला असला तरी सायंकाळ नंतर ४००९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. रविवारी दिवसभर १५२० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी त्यामध्ये वाढ होऊन एकूण ४००९ क्युसेक वेगाने पाणी नदीत प्रवाहित करण्यात आले. म्हणजेच दिवसभरात २४८९ इतका विसर्ग करण्यात आलेला आहे.

गंगापूर धरणाची पातळी वाढत असली तरी समाधानकारक पाऊस नसल्याने तसेच समूहातील अन्य धरणांची पातळीदेखील स्थिर असल्यामुळे धरणातून शनिवारपर्यंत विसर्ग करण्यात आलेला नव्हता. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक झाल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. सोमवारी दिवसभरात टप्क्याटप्क्याने पाणी प्रवाहित करण्यात आले. पावसाचा जोर लक्षात घेता पाच हजार क्युसेकपर्यंत विसर्ग जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४००९ क्युसेक इतक्या वेगाने पाणी सुरू होते.

--इन्फो--

विसर्ग वेळ

१५२० स. ६ वा.

२५५७ स. ९ वा

२५५७ दु. १२ वा.

३५०० दु. २ वा.

३६०८ दु. ३ वा.

४००९ दु. ४ वा.\

--इन्फो--

नदीकाठावरील टपऱ्यांमध्ये पाणी

गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काठावरील अनेक टपऱ्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचे नुकसान झाले. पाणी सातत्याने वाढत असल्यामुळे विक्रेत्यांनी तातडीने आपली दुकाने हटविण्यास प्रारंभ केला. साठलेल्या पाण्यातून दुकाने हलविण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागले. काठावर राहणाऱ्यांनीही वेळीच आपले संसारोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी हलविले.

Web Title: Four thousand cusecs of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.