चार हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:33 AM2018-07-16T00:33:13+5:302018-07-16T00:42:53+5:30
नाशिक : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून देणाऱ्या शिष्यवृत्तीचा घोळ अद्यापही कायम असून, सन २०१७-१८ वर्षासाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन शिष्यवृत्तीचे प्रकरणे दाखल करणाºया विद्यार्थ्यांच्या अर्जावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सुमारे ४,१३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
नाशिक : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून देणाऱ्या शिष्यवृत्तीचा घोळ अद्यापही कायम असून, सन २०१७-१८ वर्षासाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन शिष्यवृत्तीचे प्रकरणे दाखल करणाºया विद्यार्थ्यांच्या अर्जावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सुमारे ४,१३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती मिळण्यासाठीचा अर्ज सादर करावा लागतो. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या समावेश असतो. यासाठी समाजकल्याण विभागाकडे अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील २०१७-१८ साठीचे आॅनलाइन आणि आॅफलाइन असे सुमारे ६८,२४६ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर आत्तापर्यंत ६३ हजार १५२ अर्ज निकाली काढण्यात आले आहे असे असलेतरी अजूनही ५,०९४ अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
आॅनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या ३६,७२२ इतकी असून, ३२ हजार ५९२ अर्ज आजवर निकाली काढण्यात आलेले आहेत. अद्यापही ४१३० विद्यार्थ्यांच्या अर्जावर निर्णय होऊ शकलेला नाही. संबंधित महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांचे ई-स्टेटमेंट समजाकल्याण विभागाला सादर करणे अपेक्षित आहे. मात्र महविद्यालयांनी अशाप्रकारचे ई-स्टेटमेंट अजूनही सादर केले नसल्यामुळे आॅनलाइन त्रुटी निर्माण झाली आहे, तर आॅफलाइन पद्धतीने ३१,५२४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ३० हजार ५६० अर्ज निकाल काढण्यात आलेले आहेत, तर उर्वरित ९५४ अर्ज अद्यापही प्रलंबित आहे.
समाजकल्याण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसतानाही कामांचा निपटारा करण्यास काहीसा वेळ होत असला तरी महाविद्यलयांच्या दिरंगाईचा फटकादेखील समाजकल्याणच्या कारभारावर येत असल्याने समाजकल्याणला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. आॅनलाइन दाखल अर्जाच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त दिसत असली तरी महाविद्यालयांकडून पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे या प्रकरणांबाबत निर्णय घेता आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
आॅनलाइन अर्जाचा गोंधळ
आॅनलाइन अर्ज दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जासाठी संबंधित महाविद्यालयाचे ई-स्टेटमेंट अपेक्षित असते. मात्र जुलै महिना उजाडूनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ई-स्टेटमेंट सादर न केल्यामुळे अशा सुमारे ४,१३० मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दाखल झालेल्या अर्जाची पडताळणी समाजल्याण शिष्यवृत्ती विभागाकडून सुरू आहे. यामध्ये ४,१३० अर्ज महाविद्यालयांच्या चुकीमुळे निर्णयाविना पडून असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी अडचण सहन करावी लागण्याची शक्यता आहे.