मनेगाव विद्यालयाला मिळाल्या चार अद्ययावत वर्गखोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:25 PM2019-05-27T14:25:34+5:302019-05-27T14:25:44+5:30
सिन्नर : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात चार अद्यावत वर्गखोल्या उभारण्यास सुरूवात झाली आहे.
सिन्नर : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात चार अद्यावत वर्गखोल्या उभारण्यास सुरूवात झाली आहे. संस्थेचे संचालक हेमंत वाजे यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे, सुवर्णमहोत्सव समितीचे अध्यक्ष टी. पी. सोनवणे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष निवृत्ती पवार, माजी सरपंच संजय सोनवणे, सुहास जाधव, अण्णा कडलग, बाळासाहेब सोनवणे, योगेश माळी, एम. आर. शिंदे, उत्तम कडलग आदी यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक जी. जी. सय्यद यांनी प्रास्ताविकात बांधकामाची माहिती दिली. त्यासाठी शालेय समितीनेही १० टक्के वर्गणी तत्काळ गोळा करून दिली. त्यानंतर संस्थेनेही निधी दिल्यामुळे विद्यालयात चार वर्गखोल्या उभारण्यात येणार आहे. शाळेभोवती संरक्षक भिंतही मंजूर झाली आहे. शाळेच्या क्रीडांगणाभोवती संरक्षक भिंत बांधून पूर्ण झाली आहे. प्रवेशद्वारही बसविण्यात आले आहे. त्यामुळे शाळेला सुरक्षा प्राप्त झाली आहे.