लासलगावहून चार व्हेंटिलेटर पिंपळगावला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:06 PM2020-09-10T23:06:05+5:302020-09-11T00:49:29+5:30

लासलगाव : निफाड तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने एकूण रुग्ण संख्या दोन हजाराच्या जवळपास गेली आहे तर आतापर्यंत ५९ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यासाठी राज्य शासनाकडून लासलगाव ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आलेले चार व्हेंटिलेटर तांत्रिक कारण पुढे करत पिंपळगाव बसवंत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Four ventilators left Lasalgaon for Pimpalgaon | लासलगावहून चार व्हेंटिलेटर पिंपळगावला रवाना

लासलगावहून चार व्हेंटिलेटर पिंपळगावला रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देलासलगावहून चार व्हेंटिलेटर पिंपळगावला रवाना

लासलगाव : निफाड तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने एकूण रुग्ण संख्या दोन हजाराच्या जवळपास गेली आहे तर आतापर्यंत ५९ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यासाठी राज्य शासनाकडून लासलगाव ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आलेले चार व्हेंटिलेटर तांत्रिक कारण पुढे करत पिंपळगाव बसवंत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत चार दिवसात पाठविलेले व्हेंटिलेटर पुन्हा कार्यान्वित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपातर्फे देण्यात आला आहे.
लासलगांव येथे कोविड सेंटरमध्ये चार व्हेटींलेटर मजूंर झाले आहेत. ते व्हेटींलेटर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी एमडी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण देत परत पाठवल्याचे निषेधार्थ लासलगांव भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश, दायमा शहर अध्यक्ष योगेश पाटील, राजेंद्र चाफेकर, रविंद्र होळकर, मनोज भावसार, सतोंष पवार, बापू लचके आदिनी लासलगाव येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्र प्रमुख डॉ राजाराम शेंद्रे यांना निवेदन सादर केले. भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याने निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. एकूण कोरोना बधितांची संख्या १९६२ वर पोहचली आहे तर आतापर्यंत कोरोनावर उपचार घेत असतांना ५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकीकडे शहरी भागात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात कोणाचे जीव जाऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून लासलगाव कोविड केसर सेंटर येथे दीड महिन्यापूर्वी १६ लाख रुपये किमतीचे चार व्हेंटिलेटर देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून या चारही व्हेंटिलेटरचा वापरण्यासंदर्भात लासलगाव येथील आरोग्य टीमला डेमो देण्यात आला होता. मात्र हे व्हेंटिलेटर कार्यन्वित न करता, मेस्मा कायदा राज्यात लागू असतानाही लासलगाव येथे तीन एमडी मेडिसिन डॉक्टर असून सुध्दा डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करत हे व्हेंटिलेटर परत केले असल्याची बाब लासलगाव भारतीय जनता पार्र्टीने दिलेल्या निवेदनातून समोर आली आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
लासलगाव व परिसरातील नागरिकांसह भाजपाच्यावतीने संताप व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच तातडीने हे चार ही व्हेंटिलेटर आणि डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देण्याची मागणी लासलगाव जिल्हापरिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप आणि नाशिक भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी केली आहे. चार दिवसात व्हेंटिलेटर कार्यान्वित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
---------------------------------------
लासलगाव येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्र प्रमुख डॉ राजाराम शेंद्रे यांना निवेदन देताना डी.के.जगताप, प्रकाश दायमा, योगेश पाटील, राजेंद्र चाफेकर, रविंद्र होळकर, मनोज भावसार. सतोंष पवार आदी. (१० लासलगाव १)
----------------
नाशिक शहरात आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत..पूर्ण आरक्षित आहेत.. ग्रामीण भागातला पेशंट अत्यवस्थ झाल्यास बेड मिळत नाहीत. त्यांनी जायचे कोठे..पैसे असूनही हॉस्पिटलमध्ये जागा नाही,बेड नाही,व्हेंटिलेटर नाही.ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचा विषयच नाही. यातही लासलगाव वरून व्हेंटिलेटर परत पाठवत असतील तर मग चुकी कोणाची? सरकारची आरोग्य व्यवस्थाच धोक्यात आली आहे,असे समजावे काय?
- सुवर्णा जगताप,महिला आघाडी जिल्हा प्रमुख,भाजप

 

 

 

 

Web Title: Four ventilators left Lasalgaon for Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.