चार गावांना टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:11 PM2020-06-02T21:11:18+5:302020-06-03T00:10:55+5:30

येवला : तालुक्यातील ३0 गावांसह १३ वाड्यांना २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, येवला पंचायत समितीकडे पगारे वस्ती, पिंपळखुटे बुद्रुक, खिर्डीसाठे, नायगव्हाण, धनकवाडी या चार गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

Four villages hit by drought | चार गावांना टंचाईच्या झळा

चार गावांना टंचाईच्या झळा

Next

येवला : तालुक्यातील ३0 गावांसह १३ वाड्यांना २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, येवला पंचायत समितीकडे पगारे वस्ती, पिंपळखुटे बुद्रुक, खिर्डीसाठे, नायगव्हाण, धनकवाडी या चार गावांचे
टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
देवठाण, राजापूर येथे विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, यासह नांदूर येथील विहिरीवरून ११ शासकीय व नऊ खासगी असे एकूण २० टँकरद्वारे ५५ खेपाद्वारे टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे.
तालुक्यातील आहेरवाडी, हडपसावरगाव, खरवंडी, चांदगाव, आडसुरेगाव, ममदापूर, लहित, जायदरे, सोमठाणदेश, रेंडाळे, कोळम बु॥ कुसमाडी, पांजरवाडी, कासारखेडे, भुलेगाव, डोंगरगाव, अनकाई, खैरगव्हाण, वसंतनगर, कोळगाव, वाईबोथी, तांदूळवाडी, वळदगाव, लौकीशिरस, गारखेडे, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, कोळम खुर्द, बदापूर, गणेशपूर या ३० गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
याबरोबरच संभाजीनगर सावरगाव, गोपाळवाडी खैरगव्हाण, शिवाजीनगर, तळवाडे, ममदापूर तांडा, ममदापूर, महादेववाडी सायगाव या वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
-----------------------
नगरसूल येथील महालगाव, कोतकरवस्ती, येवले वस्ती, जाधव वस्ती, भगडे वस्ती तेली, बहादुरे वस्ती, वडाचा मळा, सोनवणे वस्ती, बांगर वस्ती, गाडेकर वस्ती, घाडगे वस्ती, मांगफाशी वस्ती, अंबूमाळी मळा, खोडके वस्ती, सानप वस्ती, बोरसे वस्ती, चिखले वस्ती, सोनवणे वस्ती, मोठा मळा, दाद मळा, रावते वस्ती, शेख वस्ती, माळवाडी, फरताळ वाडी, डोंगरे वस्ती, बोढरे वस्ती, खजुरे वस्ती, पवार वस्ती, घनामाळी मळा, चौफुली वस्ती, पवार वस्ती, बागल वस्ती, राणू माळी मळा, मूळबाई घाट, कटके वस्ती, कापसे वस्ती, महादेवनगर या वस्त्यांना आठ टँकर खेपांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

 

Web Title: Four villages hit by drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक