चारचाकी वाहनांची वाहतूक आता रेल्वेगाडीद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 06:39 PM2020-08-03T18:39:45+5:302020-08-03T18:43:13+5:30
मनमाड : रेल्वे प्रशासनाने २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या पुढाकारातून महिंद्रासारख्या आॅटोमोबाईल कंपन्यांनी देशाच्या काही भागांत रेल्वे रॅकद्वारे चारचाकी वाहने पाठविणे सुरू केले आहे. यामुळे मौल्यवान इंधनाची बचत होउन कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवता येते आहे.

महाराष्ट्र हे एक मोठे आॅटोमोबाईल वाहन केंद्र आहे. येथे महिंद्र, टाटा, फोर्ड, पियाजिओ, बजाज इत्यादी कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद भागात वाहने तयार करतात. महाराष्ट्रात उत्पादित वाहने देशाच्या विविध भागात नेण्याची बरीच क्षमता आहे.
पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या व्यवसाय विकास युनिट्सने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक आणि जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी प्रशासनाशी झालेल्या एकत्रित बैठकीमुळे रेल्वे रॅकद्वारे वाहने पाठवण्याच्या निर्णयाला चालना मिळाली. वाहने पोहोचविण्यासाठी प्रथमपासून शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी असल्याने आपल्या प्लांटमध्ये तयार झालेल्या नवीन वाहनांना देशातील विविध शहरांमधील डिलर्सकडे नेण्यासाठी लागणारा वेळ कमी होत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून विशिष्ठ रॅकमधून वाहने पाठवली जात आहे. या रेकमध्ये ११८ वाहने नेऊ शकतात तर नवीन उच्च क्षमता असलेली बीसीएसीबीएम रेल्वे वाघिणीची रेक अंदाजे ३०० वाहने वाहून नेऊ शकते. सध्या, रेल्वे आॅटोमोबाईल वाहतुकीसाठी न्यू मॉडिफाइड गुड्स (एनएमजी) रॅक आणि खाजगी मालकीचे बीसीएसीबीएम रॅकचा वापर करते. वाहूकीची वेळ कमी करण्यासाठी या रॅक्सच्या वाहतुकी वर बारीक नजर ठेवली जात आहे आणि त्यानंतर पुढील लोडिंगसाठी हे रॅक्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे. वाहन कंपन्यांसमवेत व्यवसाय विकास युनिट्सच्या बैठका घेतल्या गेल्या आहे. जुलै २०२० मध्ये मध्य रेल्वेने १८ रेकद्वारे मोटारींची वाहतूक केली आहे.
(फोटो ०३ मनमाड)