कारखान्यात चार कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:11+5:302021-03-29T04:09:11+5:30
कांद्याला हमी भावाची मागणी सिन्नर : केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला कमीत कमी ३० रुपये प्रति किलो हमीभाव ...
कांद्याला हमी भावाची मागणी
सिन्नर : केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला कमीत कमी ३० रुपये प्रति किलो हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मोहीम राबविली आहे. मोहिमेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह विविध संस्थांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
गुळवंचला सायकलचे वितरण
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून शालेय विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून शाळेत येणाऱ्या २७ विद्यार्थिनींना याचा लाभ झाला आहे. तसेच पाच दिव्यांगांना घरघंटीचे वाटप करण्यात आले.
पूर्व भागात नुकसानीची पाहणी
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. नांदूरशिंगोटे जिल्हा परिषद गटाचे सदस्य नीलेश केदार यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल संबंधित विभागाला पाठविण्याच्या सूचना दिल्या.