आइस्क्रीमचे आमिष दाखवून चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By admin | Published: May 11, 2017 04:26 PM2017-05-11T16:26:44+5:302017-05-11T17:01:59+5:30

आइस्क्रीमचे आमिष दाखवून एका चार वर्षीय बालिकेवर फरसाण व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची निंदणीय घटना

A four-year-old girl raped by showing ice cream bait | आइस्क्रीमचे आमिष दाखवून चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

आइस्क्रीमचे आमिष दाखवून चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 11 : आइस्क्रीमचे आमिष दाखवून एका चार वर्षीय बालिकेवर फरसाण व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची निंदणीय घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्यावर महिलांनी मोर्चा काढून नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील सिन्नरफाटा भागात राहणारा व्यापारी संशयित सुभाष प्रकाशचंद्र झवर (५१) याने शेजारील एका बालिकेला घरात बोलावून आइस्क्रीमचे आमिष दाखविले. घराचा दरवाजा बंद करून घेत तिचे लैंगिक शोषण करीत अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित झवर यास अटक केली असून त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर बालिक ा अस्वस्थ झाल्यानंतर रडत-रडत घरात आली असता आईने विचारपूस केली तेव्हा सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. विशेष म्हणजे या नराधमाने त्या बालिकेला आइस्क्रिम देण्याचा बहाणा करून स्वत:च्या घरी आणले. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याने बालिकेच्या शरीरावर विविध भागांचा चावा घेतला व लैंगिक अत्याचार करून गुप्तांगही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नराधम झवरविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

संतापाचा उद्रेक - 
नाशिकरोड पोलिसांनी संशयित नराधम झवर यास अटक करून वैद्यकिय तपासणीसाठी बिटको रुग्णालयात आणले असता तेथे जमलेल्या शेकडो महिलांनी घोषणाबाजी करत नराधमाचा निषेध केला आणि सरकारने त्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील विविध माहिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून संशयित झवरविरूध्द कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: A four-year-old girl raped by showing ice cream bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.