सासºयाचा खून करणारा संशयित साडेचार वर्षानंतर चर्तुभूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 05:48 PM2018-02-27T17:48:58+5:302018-02-27T17:48:58+5:30
सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये म्हणजे साडेचार वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता. या प्रकरणातील संशयित खूनी जावई सुमारे साडेचार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. सासºयाचा खून करणाºया संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी शेतमजूर व मेंढपाळाचा पेहराव धारण करुन चांदवड तालुक्यातील बोपाने येथे छापा टाकून अटक केली.
सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये म्हणजे साडेचार वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता. या प्रकरणातील संशयित खूनी जावई सुमारे साडेचार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. सासºयाचा खून करणाºया संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी शेतमजूर व मेंढपाळाचा पेहराव धारण करुन चांदवड तालुक्यातील बोपाने येथे छापा टाकून अटक केली. सदर गुन्हा घडल्यापासून संशयित सोमनाथ फुलाजी मोरे रा. खंबाळे ता. सिन्नर हा नंदूरबार जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून राहत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदवड तालुक्यातील बोपाने गावातून त्यास ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे एका शेतकºयाकडे सालकरी म्हणून काम करणाºया मयत आत्माराम नामदेव सूर्यवंशी यास नऊ मुली व मुलगा आहे. सूर्यवंशी कुटुंबिय मूळ संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथील असून गेल्या काही वर्षापासून ते मजूरी काम करतांना २०१३ साली नांदूरशिंगोटे शिवारात वास्तव्यास होते. सूर्यवंशी यांची एक मुलगी सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील सोमनाथ मोरे याला दिली होती. तथापि, सोमनाथ सदर मुलीस त्रास देत होता. त्यामुळे मुलगी सूर्यवंशी यांच्याकडे नांदूरशिंगोटे येथे होती. त्यांचा जावई सोमनाथ मोरे पत्नीला घेण्यासाठी नांदूरशिंगोटे येथे सूर्यवंशी यांच्याकडे आला होता. त्यावेळी सासरे सूर्यवंशी यांनी मुलीला जावयासोबत पाठविण्यास नकार दिला. त्यावेळी सासरा व जावई यांच्या शाब्दीक चकमक झाली होती. यात सासºयाने जावयाच्या थापड मारली होती. यावेळी जावई सोमनाथ त्याचा साडू विजय बर्डे यांच्यासमक्ष याने सासरे सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी सासरे आत्माराम नामदेव सूर्यवंशी (५५) यांचा मृतदेह बाजरीच्या शेतात आढळून आला. यावेळी अर्धा तासापूर्वी त्यांचा जावई सोमनाथ तेथून जातांना पाहिला होता. त्यामुळे सोमनाथ फुलाजी मोरे याने अज्ञात हत्याराने वार करुन सूर्यवंशी यांचा खून केल्याची फिर्याद विजय बर्डे यांनी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सोमनाथ मोरे याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, संशयित मोरे साडेचार वर्षे फरार होता. पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी फरार आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने फरार आरोपीचा शोध घेण्याची मोहीम राबविली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवी वानखेडे, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने चांदवड तालुक्यात बोपाने येथे वास्तव्यास असलेल्या संशयितास अटक करुन वावी पोलिसांच्या ताब्यात दिले.