चौदा वर्षांनंतर भाबडबारी, शेलबारी टोलमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:56 AM2020-02-22T00:56:23+5:302020-02-22T01:24:40+5:30

नितीन बोरसे । सटाणा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या शिर्डी-साक्री मार्गावरील भाबडबारी व शिरवाडे टोलनाका यांच्या वसुलीची ...

Fourteen years later, Bhavbari, Shelbari toll free | चौदा वर्षांनंतर भाबडबारी, शेलबारी टोलमुक्त

चौदा वर्षांनंतर भाबडबारी, शेलबारी टोलमुक्त

Next
ठळक मुद्देशिर्डी-साक्री महामार्ग : वसुलीची मुदत संपुष्टात आल्याने चालकांना दिलासा

नितीन बोरसे ।
सटाणा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या शिर्डी-साक्री मार्गावरील भाबडबारी व शिरवाडे टोलनाका यांच्या वसुलीची मुदत शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्रीपासून संपुष्टात आल्याने महामार्ग तब्बल १४ वर्षांनंतर टोलमुक्त झाला आहे. सार्वजनिक बांधकाम टोलवसुलीची काढलेली अधिसूचना रद्द केली आहे. मार्गाच्या कॉँक्रिटीकरणासह दुपदरीकरणही होणार असून, त्यामुळे कोंडीही मोकळी होण्यास मदत होणार आहे.
पंधरा वर्षांपूर्वी दहीवेल-सोग्रस या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. गुजरात राज्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्यामुळे जड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. त्यामुळे २००६-०७ मध्ये ‘बांधा आणि वापरा’ तत्त्वावर दहीवेल ते सोग्रस अशा ८६.९०० किलोमीटर रस्त्याचे काम करून भाबडबारी आणि शेलबारी नजीकच्या शिरवाडे अशा दोन ठिकाणी टोल उभारण्यात आले होते. त्या दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टोल वसुलीसाठी अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनंतर शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्री १२ वाजेपासून सदर महामार्ग टोलमुक्त झाला आहे. बांधकाम विभागाने त्यासंबंधीची अधिसूचना रद्द केली आहे. या मार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून, गेल्या ३ जानेवारी २०१७ रोजी दिल्लीच्या भूपृष्ठवाहतूक महामार्ग मंत्रालयाने शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी म्हणून या मार्गाची घोषणा केली होती.
७ मीटरचा रस्ता होणार आता १० मीटर
सोग्रस ते दहीवेल ह्या ८६.९०० किलोमीटरच्या रस्त्याची रु ंदी ७ मीटर इतकी आहे. या मार्गावर वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निष्पाप बळी गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी पुढे आली होती. शासनाने याची दखल घेऊन रस्ता विकासासाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. सुरुवातीला या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर रस्त्याचे चौपदरीकरणचे काम प्रस्तावित करण्यात आले होते, मात्र या रस्त्याची निविदा दुपदरीकरणाची असल्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे. हा रस्ता आता ७ मीटरऐवजी १० मीटर रुंदीचा होणार असून, संपूर्ण रस्ता काँक्र ीटचा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळनेर ते सटाण्याच्या इदगाह मैदानापर्यंत तयार करण्यात येणार आहे.
७ मीटरचा रस्ता होणार आता १० मीटर
सोग्रस ते दहीवेल ह्या ८६.९०० किलोमीटरच्या रस्त्याची रु ंदी ७ मीटर इतकी आहे. या मार्गावर वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निष्पाप बळी गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी पुढे आली होती. शासनाने हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर रस्त्याचे चौपदरीकरणचे काम प्रस्तावित करण्यात आले होते, मात्र या रस्त्याची निविदा दुपदरीकरणाची असल्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार आहे. हा रस्ता आता ७ मीटरऐवजी १० मीटर रुंदीचा होणार असून, संपूर्ण रस्ता काँक्र ीटचा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळनेर ते सटाण्याच्या इदगाह मैदानापर्यंत तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Fourteen years later, Bhavbari, Shelbari toll free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.