कळवण पंचायत समितीवर चौथ्यांदा प्रशासकीय राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 11:43 PM2022-03-14T23:43:20+5:302022-03-14T23:44:28+5:30

कळवण : पंचायत समित्यांचा कार्यकाळ रविवार १३ मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी चालवणार असल्याने पंचायत समितीमधील विद्यमान लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाला आळा बसणार आहे.

Fourth administrative rule on Kalvan Panchayat Samiti | कळवण पंचायत समितीवर चौथ्यांदा प्रशासकीय राजवट

कळवण पंचायत समितीवर चौथ्यांदा प्रशासकीय राजवट

Next
ठळक मुद्देकळवण पंचायत समितीची स्थापना सन १९६२ मध्ये झाली.

कळवण : पंचायत समित्यांचा कार्यकाळ रविवार १३ मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी चालवणार असल्याने पंचायत समितीमधील विद्यमान लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाला आळा बसणार आहे.

कळवण पंचायत समितीची स्थापना सन १९६२ मध्ये झाली. स्थापनेनंतर प्रशासकीय राजवट येण्याची ही पाचवी वेळ आहे.
कळवण पंचायत समितीचे ९ वे सभापती गोविंदराव रावजी जाधव हे सभापती असतांना त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे २३ ऑगस्ट १९७५ ते १३ जुलै १९७९ या काळात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर ३० जून १९९० मध्ये एन. एम. पवार हे सभापती असताना पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे १ जुलै १९९० ते १३ मार्च १९९२ या काळात प्रशासकीय राजवट होती. २० नोव्हेंबर २००१ मध्ये पंचायत समिती सभापती काशीनाथ गायकवाड असताना पंचायत समिती कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे २९ नोव्हेंबर २००१ ते १३ मार्च २००२ या काळात प्रशासकीय राजवट होती. तब्बल २० वर्षांनंतर पंचायत समितीमध्ये पुन्हा प्रशासकीय राजवट आली असून विद्यमान सभापती मनीषा पवार यांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपल्यामुळे १४ मार्चपासून प्रशासकीय राजवट पंचायत समितीमध्ये सुरू झाली आहे. कळवण पंचायत समितीच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार यापुढे गटविकास अधिकारी डॉ. पाटील पाहणार आहेत.

Web Title: Fourth administrative rule on Kalvan Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.