मार्चमध्येच ओलांडली चाळीशी

By admin | Published: March 28, 2017 12:33 AM2017-03-28T00:33:22+5:302017-03-28T00:33:50+5:30

नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, तपमानाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकू लागल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली

Fourth crossing in March | मार्चमध्येच ओलांडली चाळीशी

मार्चमध्येच ओलांडली चाळीशी

Next

मार्चमध्येच ओलांडली चाळीशी
नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, तपमानाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकू लागल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली असून, ४०.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली. अजून दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
हंगामातील सर्वाधिक कमाल तपमान रविवारी ४०.१ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानाचा पारा पुन्हा खाली घसरेल असे वाटत असताना सोमवारीही तपमानाचा पारा अधिकच चढला. तपमानाने चाळीशी ओलांडली असून, ४०.३ इतका उच्चांक दहा वर्षांत प्रथमच मार्चमध्ये झाल्याचे हवामान खात्याकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. वाढत्या तपमानामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका बसत असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या तपमानामुळे थंड हवेचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकमध्येही नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारपर्यंत तपमानाचा पारा ३८ अंशांवर स्थिरावत होता; मात्र शुक्रवारपासून तपमानाचा पारा अधिकच चढू लागला असून, चाळीशी ओलांडली आहे. मागील वर्षापेक्षा अधिक तीव्र उन्हाळा नाशिककरांना यंदा अनुभवयास येत आहे. गेल्या वर्षी २५ मार्च रोजी ३९.७ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली होती. ही नोंद मार्च महिन्यामधील उच्चांक ठरली होती. मार्च महिन्यात गेल्या वर्षी ३९.७ अंशांच्या पुढे कमाल तपमानाचा पारा सरकला नव्हता, मात्र यावर्षी मार्च महिन्यातच कमाल तपमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. दहा वर्षांमध्ये यावर्षी प्रथमच मार्च महिन्यात शहराचे तपमान चाळीशीपर्यंत गेले आहे.
तपमानाच्या चाळीशीचा आढावा
वर्ष (महिना) कमाल तपमान (अंशामध्ये)
१६ एप्रिल २०१०४२.०
२७ एप्रिल २०११४०.४
८ एप्रिल २०१२४०.०
१ मे २०१३ ४०.६
७ मे २०१४ ४०.०
२० एप्रिल २०१५४०.६
१८ मे २०१६ ४१.०
१९ एप्रिल २०१६४१.०
२७ मार्च २०१७४०.३

Web Title: Fourth crossing in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.