नाशकात चौघा गणेशभक्तांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:07 AM2017-09-07T00:07:41+5:302017-09-07T00:07:51+5:30

नाशिक शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली़ विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये जुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश आहे़ या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे.

 Fourth of the Ganesh devotees drowned in Nashik | नाशकात चौघा गणेशभक्तांचा बुडून मृत्यू

नाशकात चौघा गणेशभक्तांचा बुडून मृत्यू

Next

नाशिक शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली़ विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये जुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश आहे़ या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे.
सून, या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
गणेश विसर्जनासाठी गंगापूर धरणावर गेलेला योगेश राम चौधरी (१९, रा़ वृंदावन गार्डन, गणेश चौक, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) या युवकाचा गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ आपल्या मित्रांसह योगेश हा आपल्या मित्रांसमवेत गणेश विसर्जनासाठी गेल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दुसरी घटना चेहेडी पंपिंग बंधारा येथे घडली़ किशोर कैलास सोनार (२४, रा़ शबनकर मळा, चेहेडी शिव, सिन्नर फाटा, नाशिकरोड) हा युवक दुपारच्या सुमारास गणेश विसर्जनासाठी चेहेडी पंपिंग बंधारा येथे गेला होता़ या ठिकाणी सेल्फी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो बंधाºयात पडला़ त्यास नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
तिसरी घटना पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात घडली़ जुने नाशिकमधील नानावलीतील संभाजी चौकातील रहिवासी नारायण राजेंद्र सूर्यवंशी (१७) हा मुलगा सायंकाळी गणेश विसर्जनासाठी गेला होता़ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गणेश विसर्जन करीत असताना तो पाण्यात बुडाला़ त्यास नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ गणेश विसर्जनासाठी गेलेला अठरा वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची चौथी घटना मुंगसरा गावाजवळ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली़ गणेश राजाराम मराठे (१८, रा़ मुंगसरा, ता़ जि़ नाशिक) हा युवक घरगुती गणेश विसर्जनासाठी गावाजवळील डोहाजवळ गेला होता़ यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व बुडून मृत्यू झाला़ या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title:  Fourth of the Ganesh devotees drowned in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.