चतुर्थश्रेणीतील कर्मचारी करतात लिपिकांची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 01:06 AM2019-12-15T01:06:57+5:302019-12-15T01:08:14+5:30
महापालिकेच्या नाशिक शहरातील सहा विभागीय कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल वसूल केला जात असलेल्या मनपाच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी म्हणून शिपाई पदावर तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून लिपिक म्हणून कामकाज करण्याचे काम आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
नरेंद्र दंडगव्हाळ । लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : महापालिकेच्या नाशिक शहरातील सहा विभागीय कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल वसूल केला जात असलेल्या मनपाच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी म्हणून शिपाई पदावर तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून लिपिक म्हणून कामकाज करण्याचे काम आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
संबंधित कर्मचारी हे त्यांच्या मर्जीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लागेबांध असल्यानेच हा प्रकार उघडकीस येत नसला तरी यामुळे नागरिकांच्या महत्त्वाच्या नोंदी तसेच महत्त्वाचा दस्ताऐवजाचे कामकाज चतुर्थश्रेणी कर्मचारी सांभाळत असून, यात काही चूकझाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न यानिमित्ताने सिडकोवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
अंबड पोलीस स्टेशनसमोर महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे. याठिकाणी सिडको तसेच अंबड भागांतील नागरिक त्यांच्या घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर कर भरण्यासाठी येतात. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी म्हणून सोमनाथ वाडेकर हे कामकाज पाहत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी सर्व विभागीय कार्यालयातील विभागीय अधिकाºयांना सूचना देत संबंधित कर्मचाºयांची ज्या विभागात नेमणूक आहे त्याच विभागात काम करण्याबाबत आदेशित केले आहे. परंतु असे असतानाही विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी आयुक्तांचा आदेश धुडकावीत काही चतुर्थश्रेणी कर्मचारी हे लिपिकाचे कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेचा प्रशासन, एक खिडकी योजना, जन्म-मुत्यू नोंदणी विभाग, आरोग्य, घरपट्टी, पाणीपुरवठा, विविध कर, उद्यान, बांधकाम, विद्युत आदी विभाग मिळून ४५३ अधिकारी व कर्मचारी काम करीत आहे. परंतु लिपिकांची संख्या कमी असल्याने बहुतांशी विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी व आरोग्य विभागात साफसफाई कामकाज करणारे हे लिपिक म्हणून काम करीत आहे.
महापालिकेच्या जन्म-मुत्यू नोंदणी विभागातही महत्त्वाच्या नोंदी घेण्यासाठी लिपिकांऐवजी चतुर्थश्रेणी कर्मचारी कामकाज करीत आहे. या विभागात एकदा झालेली नोंदमध्ये बदल करता येत नसून अशा विभागांत तसेच आरोग्य विभागात सफाई कर्मचारी असलेले कर्मचारीदेखील लिपिक म्हणून काम करीत आहे. याबाबत विभागीय अधिकाºयांना माहिती असतानाही त्याकडे डोळेझाक करीत असल्यान याबाबत मनपा आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
आधीच मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अनेकदा कामावर वेळेवर हजर राहत नसल्याचे याआधी उघड झालेले आहे. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील बेजबाबदार अधिकाºयांमुळे कामकाज करणाºया नागरिकांनादेखील त्यांच्या कामासाठी ताटकळत रहावे लागते. कामकाज करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर विभागीय अधिकारी यांचा धाक नसून सफाई कर्मचारी जर लिपिकाचे काम करीत असेल तर याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना महत्त्वाची कागदपत्रं हाताळणे, नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे, बिल तयार करणे आदी महत्त्वाची कामे दिली जात असले तरी यात काही चूक झाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.