शिवसेनेच्या उमेदवारीत चौथा भागीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:42 AM2019-03-06T00:42:26+5:302019-03-06T00:42:50+5:30

नाशिक : नाशिक मतदारसंघातून लोकसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तिघांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच त्यात आता चौथ्याची भर पडल्याने शिवसैनिकच संभ्रमात पडले आहेत. तथापि, एका जागेसाठी चार दावेदार पुढे आल्यामुळे त्यांच्यातील नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक्यताही वर्तविली जात असून, आता पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Fourth participant in Shiv Sena's candidature | शिवसेनेच्या उमेदवारीत चौथा भागीदार

शिवसेनेच्या उमेदवारीत चौथा भागीदार

Next
ठळक मुद्दे आता पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष

नाशिक : नाशिक मतदारसंघातून लोकसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तिघांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच त्यात आता चौथ्याची भर पडल्याने शिवसैनिकच संभ्रमात पडले आहेत. तथापि, एका जागेसाठी चार दावेदार पुढे आल्यामुळे त्यांच्यातील नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक्यताही वर्तविली जात असून, आता पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असे समजून तयारी चालविली असताना जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्यासाठी गोडसे यांचे पक्ष संघटनेकडे गेल्या पाच वर्षांत झालेले दुर्लक्ष व नगरसेवकांची नाराजी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या दोघांमध्ये वाद सुरू असतानाच सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीदेखील लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित करून शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केल्याचे वृत्त आहे. दररोज सेनेच्या उमेदवारीवरून होत असलेले दावे, प्रतिदावे व पक्षश्रेष्ठींना शिष्टमंडळे भेटत असताना मंगळवारी नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनीदेखील आपण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे थेट पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. त्यासाठी ज्यावेळी आपण सेनेत प्रवेश केला त्याचवेळी पक्ष प्रमुखांनी शब्द दिल्याचा
दावा त्यांनी केला. चुंभळे यांची पत्नी सध्या सेनेची नगरसेविका असून, चुंभळे हे जिल्हा बॅँकेचे संचालकदेखील आहेत. सेनेच्या उमेदवारीचा तिढा दिवसागणिक वाढत चालला असून, उमेदवारीसाठी दावेदारी करणाऱ्यांचे गट सक्रिय होऊन एकमेकांच्या विरोधातील पुरावे गोळा करीत आहेत. पक्षाच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरून सुरू असलेला तिढा शिवसैनिक मुकाट्याने पहात असून, अशाने गटबाजी वाढीस लागून त्यातून पक्षाचेच नुकसान होण्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेच्या उमेदवारीत चौथा भागीदारनाशिक : नाशिक मतदारसंघातून लोकसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तिघांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच त्यात आता चौथ्याची भर पडल्याने शिवसैनिकच संभ्रमात पडले आहेत. तथापि, एका जागेसाठी चार दावेदार पुढे आल्यामुळे त्यांच्यातील नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक्यताही वर्तविली जात असून, आता पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असे समजून तयारी चालविली असताना जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्यासाठी गोडसे यांचे पक्ष संघटनेकडे गेल्या पाच वर्षांत झालेले दुर्लक्ष व नगरसेवकांची नाराजी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या दोघांमध्ये वाद सुरू असतानाच सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीदेखील लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित करून शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केल्याचे वृत्त आहे. दररोज सेनेच्या उमेदवारीवरून होत असलेले दावे, प्रतिदावे व पक्षश्रेष्ठींना शिष्टमंडळे भेटत असताना मंगळवारी नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनीदेखील आपण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे थेट पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. त्यासाठी ज्यावेळी आपण सेनेत प्रवेश केला त्याचवेळी पक्ष प्रमुखांनी शब्द दिल्याचा
दावा त्यांनी केला. चुंभळे यांची पत्नी सध्या सेनेची नगरसेविका असून, चुंभळे हे जिल्हा बॅँकेचे संचालकदेखील आहेत. सेनेच्या उमेदवारीचा तिढा दिवसागणिक वाढत चालला असून, उमेदवारीसाठी दावेदारी करणाऱ्यांचे गट सक्रिय होऊन एकमेकांच्या विरोधातील पुरावे गोळा करीत आहेत. पक्षाच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरून सुरू असलेला तिढा शिवसैनिक मुकाट्याने पहात असून, अशाने गटबाजी वाढीस लागून त्यातून पक्षाचेच नुकसान होण्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title: Fourth participant in Shiv Sena's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.