मुथूट दरोड्यातील चौथ्या दरोडेखोराला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:45 AM2019-10-04T00:45:11+5:302019-10-04T00:47:47+5:30
नाशिक : ‘मुथूट’ दरोड्यातील चौथा संशयित दरोडेखोर सुभाष केसरी गौडला (३३, रा. मूळ उत्तर प्रदेश) हरियाणा राज्याच्या फरिदाबादमधील एका औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या झोपडपट्टीमधून गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

त्यास बुधवारी (दि. २) मोक्का विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, १४ जून रोजी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाºया आंतरराज्यीय सराईत दरोडेखोरांच्या टोळीला सातपूरमध्ये सुभाष गौड याने आश्रय दिला होता. गुन्हा घडल्यापासून तो आपला कबिला घेऊन उत्तर प्रदेशमध्ये दडून बसला होता. त्याच्या मुसक्या आवळण्यास अपयश येत होते. पोलिसांनी त्यानंतर तपास थंडावल्याचा बनाव करत सुभाषचे ‘लोकेशन’ मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यामुळे सुभाष गुजरातमधील बलसाडमध्ये असल्याचे ‘स्थिर लोकेशन’ तपासी पथकाला मिळाले. जबरी गुन्ह्याचा कट आखून संघटितपणे सशस्र दरोडा टाकत एका युवकावर गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी मुथूट दरोड्याच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’नुसार कारवाई केली आहे. या दरोड्याचा कट शिजविण्यापासून तो प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यापर्यंत १२ दरोडेखोरांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.