फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 10:00 PM2019-09-29T22:00:00+5:302019-09-29T22:03:01+5:30

 नाशिक शहरात गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १२५० ते १५० रुपये जाळीने विकला जात असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ होण्याची शक्यचा फूलविक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

The fragrance of the fragrance in the flower market is expensive; Demand increased during Navratri festival | फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली

फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली

Next
ठळक मुद्दे नाशकात नवरात्रोत्सवामुळे फुलांना वाढली मागणी मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने भाव वधारले परतीचा पावसाच्या फटक्यामुळे फुलांची आवक घटली

 नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १२५० ते १५० रुपये जाळीने विकला जात असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ होण्याची शक्यचा फूलविक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. 
नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फूलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून, अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात कापडाची कृत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सवांमध्ये खऱ्या फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फूलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विविध फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले.  नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून, दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी परतीच्या पावसाचा फटका बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. 

इन्फो- असे आहेत दर :
झेंडू जाळी-१२५ ते १५० रुपये 
मोगरा (प्रतिकिलो) - ६०० ते ८०० रुपये,
अस्ट्रर - १८० ते २०० रुपये 
शेवंती (प्रतिकिलो)-१५० ते २०० रुपये,
गुलाब (प्रति १० नग) १० ते १२ रुपये, 
साधा गुलाब (प्रति १० नग) ८ ते १० रुपये,
निशिगंधा (प्रतिकिलो) १५० ते १८० रुपये, 
जरबेरा (प्रति १० नग) ५० ते ६० रुपये.
लीली (प्रती ५० नग) १० -२५ रुपये  

Web Title: The fragrance of the fragrance in the flower market is expensive; Demand increased during Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.