फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:23 AM2019-10-05T00:23:39+5:302019-10-05T00:24:04+5:30

गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे.

The fragrance of fragrance in the flower market was expensive | फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला

फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला

Next
ठळक मुद्देनवरात्रोत्सवात मागणी वाढली : फूलशेतीला पावसाचा फटका; आवक घटल्याने भाव वधारले

नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १२५० ते १५० रुपये जाळीने विकला जात असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ होण्याची शक्यचा फूलविक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फूलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून, अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात कापडाची कृत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सवांमध्ये खºया फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फूलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विविध फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले. नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे.
नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून, दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी परतीच्या पावसाचा फटका बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
असे आहेत दर
झेंडू जाळी - १२५ ते १५० रुपये
४मोगरा (प्रतिकिलो) - ६०० ते ८०० रुपये
४अस्ट्रर - १८० ते २०० रुपये
४शेवंती (प्रतिकिलो) - १५० ते २०० रुपये
४गुलाब (प्रति १० नग) - १० ते १२ रुपये
४साधा गुलाब (प्रति १० नग) - ८ ते १० रुपये
४निशिगंधा (प्रतिकिलो) - १५० ते १८० रुपये
४जरबेरा (प्रति १० नग) - ५० ते ६० रुपये
४लीली (प्रती ५० नग) - १० -२५ रुपये

Web Title: The fragrance of fragrance in the flower market was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.