उन्हाळ्यात दरवळला मातीचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:20 AM2018-03-19T01:20:18+5:302018-03-19T01:20:18+5:30

नाशिक : उन्हाळा सुरू झाला असून, कमाल तपमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकला. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना अचानक लहरी निसर्गाने आपला रंग बदलला. संध्याकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर शहरात रिमझिम थेंब पडू लागल्याने ऐन उन्हाळ्यात मातीचा सुगंध दरवळल्याचा अनुभव नागरिकांना आला.

The fragrance of the soil in summer | उन्हाळ्यात दरवळला मातीचा सुगंध

उन्हाळ्यात दरवळला मातीचा सुगंध

googlenewsNext
ठळक मुद्देसंध्याकाळी रिमझिम वारा सुटल्याने उष्म्यापासून दिलासा

नाशिक : उन्हाळा सुरू झाला असून, कमाल तपमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकला. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना अचानक लहरी निसर्गाने आपला रंग बदलला. संध्याकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर शहरात रिमझिम थेंब पडू लागल्याने ऐन उन्हाळ्यात मातीचा सुगंध दरवळल्याचा अनुभव नागरिकांना आला.
उन्हाळ्याच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले असताना शहराचे कमाल तपमान वाढत आहे. शहराचे वातावरण तापू लागले असून, लहरी निसर्ग सतत आपले रूप बदलत आहे. कधी तीव्र ऊन तर कधी ढगाळ हवामान असे वातावरण अनुभवयास येत असताना रविवारी (दि.१८) संध्याकाळी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाच्या थेंबांमुळे मातीचा सुगंध दरवळू लागला होता. तत्पूर्वी ढगाळ हवामान तयार झाले होते. वाराही सुटला होता. यामुळे जणू जोरदार पाऊस होतो की क ाय, अशी शंका नागरिकांना येत होती. शहरातील काही भागांमध्ये तुरळक पावसाचे थेंब आल्याने मातीचा सुगंध येऊ लागला होता.
शहरात दिवसभर वारा वाहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. त्यामुळे नववर्ष स्वागताचा जल्लोष द्विगुणित झाला होता. शहराचे रविवारी (दि.१८) कमाल तपमान ३४.९ तर किमान तपमान १५.९ अंश इतके नोंदविले गेले.

Web Title: The fragrance of the soil in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक