एफआरएचे निर्णय संस्थांच्या हिताचेच, मासूचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:28+5:302021-01-18T04:13:28+5:30

नाशिक : उच्च व तंत्र शिक्षण विभाग व शुल्क नियंत्रण प्राधिकरण (एफआरए) विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यास असमर्थ असून, ...

The FRA's decision is in the best interest of the organization, Masu alleged | एफआरएचे निर्णय संस्थांच्या हिताचेच, मासूचा आरोप

एफआरएचे निर्णय संस्थांच्या हिताचेच, मासूचा आरोप

Next

नाशिक : उच्च व तंत्र शिक्षण विभाग व शुल्क नियंत्रण प्राधिकरण (एफआरए) विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यास असमर्थ असून, सरकार व एफआरएकडून केवळ खासगी शैक्षणिक संस्थांना पोषक असेच निर्णय घेतले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे करण्यात आला आहे.

राज्यातील जवळपास २९ लाख विद्यार्थी हे विना परीक्षा पास करण्यात आलेले असून, या विद्यार्थ्यांकडून प्रतिविद्यार्थी ५०० रुपये परीक्षा फी आकारण्यात आली असून, वेगवगेळ्या विद्यापीठ व महाविद्यालयांनी सुमारे १४० कोटी रुपये सामूहिकरीत्या जमा केल्याचा आरोप मासूतर्फे करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारभाराकडे राज्य शासन आणि एफआरएचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक फलक लावून ‘फी माफिया केंद्र’ नामकरण करीत आंदोलन करण्यात आल्याची माहिती मासूतर्फे देण्यात आली आहे.

Web Title: The FRA's decision is in the best interest of the organization, Masu alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.