शासकीय आदिवासी वसतिगृहात स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:56 PM2018-02-21T23:56:34+5:302018-02-22T00:17:40+5:30
शहरातील शासकीय आदिवासी मुले-मुली वसतिगृहाचे एकत्रित स्नेहसंमेलन झाले. हे स्नेहसंमेलन दोन सत्रात पार पडले. पहिल्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वसतिगृहातील मुला-मुलींची एकत्रित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
येवला : शहरातील शासकीय आदिवासी मुले-मुली वसतिगृहाचे एकत्रित स्नेहसंमेलन झाले. हे स्नेहसंमेलन दोन सत्रात पार पडले.
पहिल्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वसतिगृहातील मुला-मुलींची एकत्रित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर ऋषिकेश खिल्लारे यांनी मार्गदर्शन केले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स, इतर अभिनय व मिमिक्र ी करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्र म यशस्वीतेसाठी आर. पी. झाल्टे, प्रज्ञा पाटील, उदास, एस. बी. गाडे, बी. एस. आहिरे, हिरामण मेश्राम, नितीन देठे, माया जगताप आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नारसिंग वळवी यांनी केले. आभार पावुलस कोकणी यांनी मानले.