सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:55+5:302020-12-12T04:30:55+5:30
------------------------ सिन्नर तालुक्यात ५६३ हरकती सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांवर ...
------------------------
सिन्नर तालुक्यात ५६३ हरकती
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांवर तब्बल ५६३ हरकती प्राप्त झाल्याची माहिती नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. हरकतींचा निपटारा करून अंतिम याद्या मदतीत प्रसिद्ध करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मात्र अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास मुदतवाढ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
--------------------
अंतिम मतदार यादी प्रसिद्धीला मुदतवाढ
सिन्नर : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तहसीलस्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्याने त्यांचा अल्प मुदतीत निपटारा करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे अंतिम याद्या मुदतीत प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत.