पावणेदोन कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:58 AM2018-09-14T01:58:36+5:302018-09-14T01:59:20+5:30

हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या तिकिटाची रक्कम जुन्या नाशकातील टूर व्यावसायिकाने दीपालीनगर येथील फिर्यादी व्यावसायिकाला परत केली नाही. तसेच दिलेले धनादेश बॅँकेतून वठलेही नाही, त्यामुळे आपली पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी अशपाक रमजान पठाण (३२) यांनी संशयित व्यावसायिकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Fraud fraud | पावणेदोन कोटींची फसवणूक

पावणेदोन कोटींची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देहज-उमराह टूर्स : चार संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या तिकिटाची रक्कम जुन्या नाशकातील टूर व्यावसायिकाने दीपालीनगर येथील फिर्यादी व्यावसायिकाला परत केली नाही. तसेच दिलेले धनादेश बॅँकेतून वठलेही नाही, त्यामुळे आपली पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी अशपाक रमजान पठाण (३२) यांनी संशयित व्यावसायिकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १ आॅगस्ट २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ या कालावधीपर्यंत दीपालीनगर येथील अल-खैर टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सचे संचालक पठाण यांच्याकडे संशयित आरोपी अब्दुल मतीन मनियार (रा. पॅराडाईज हाइट्स, वडाळारोड), अजीज बनेमिया मनियार, जावेद हनीफ शेख (रा. सेक्टर-२ वाशी, नवी मुंबई), समीर मनियार (काजीपुरा, जुने नाशिक) यांनी त्यांना काही प्रवासी विमानतळावर अडकले असल्याने ‘आम्ही अडचणीत आलो आहोत, तुम्ही त्यांचे तिकीट काढून द्यावे, आम्ही तुम्हाला तिकिटाच्या रकमेचे धनादेश देऊ’ असे सांगून विश्वास संपादन केल्याचे फिर्यादित म्हटले
आहे.
ठरलेल्या व्यवहारानुसार १ कोटी ७५ लाख ११ हजार ३२८ रुपये दिले नाही त्यामुळे पठाण यांनी या चौघांविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व संशयितांमध्ये यापूर्वीही असे आर्थिक व्यवहार झाले आहेत. तिकिटासाठी फिर्यादीने भरलेली रक्कम व नफा, असा दुहेरी आर्थिक फ टका त्यांना बसला आहे. चौघांनी आपापसात संगनमत क रून पूर्वनियोजित कट-कारस्थान रचून विश्वासघात केल्याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे. संशयितांनी त्यांना त्या रकमेचा धनादेशही दिला; मात्र बॅँक खात्यात धनादेशावरील रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वठू शकला नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे पठाण यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नंदवाळकर करीत आहेत.

व्यवहाराची रक्कम दिली नाही
हज, उमराह यात्रेसाठी जाणाºया भाविकांना खासगी टुर्समार्फत प्रवास सुविधा पुरविण्याचा पठाण यांचा व्यवसाय दीपालीनगरमध्ये आहे. त्यांनी वर्षभरापूर्वीच हा व्यवसाय सुरू केल्याचे समजते. संशयित चौघेदेखील हज-उमराह यात्रा टुर्सचा व्यवसाय करतात, त्यांनी पठाण यांच्यामार्फत सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकीट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे.

Web Title: Fraud fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.