बनावट संमतीपत्राद्वारे महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:20 AM2018-09-19T00:20:36+5:302018-09-19T00:21:03+5:30
महिलेच्या नावे बनावट संमतीपत्र तयार करून ते महापालिकेला सादर करून रो-हाउसच्या वाढीव बांधकामाची परवानगी घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी संशयित ईश्वर पंडित सोनवणे (रा. क्रिष्णनगर, अंबड, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : महिलेच्या नावे बनावट संमतीपत्र तयार करून ते महापालिकेला सादर करून रो-हाउसच्या वाढीव बांधकामाची परवानगी घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी संशयित ईश्वर पंडित सोनवणे (रा. क्रिष्णनगर, अंबड, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात रत्ना महाजन (रामकृष्ण रो-हाउस नंबर, कृष्णनगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी २०१५ मध्ये त्यांच्या श्रीकृष्ण रो-हाउस क्रमांक ३ चे मालक संशयित ईश्वर सोनवणे यांनी त्याच्या रो-हाउसच्या वाढीव बांधकामासाठी महाजन यांची संमती घेण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र तयार केले़ तसेच या संमतीपत्रावरील महाजन यांच्या नावासमोर खोटी सही करून ते नाशिक महानगरपालिकेत सादर केले व वाढीव बांधकामाची परवानगी मिळविली़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़