ऊर्जामंंत्र्यांकडून सामान्य जनतेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:08+5:302021-02-05T05:49:08+5:30
सिन्नर : ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा सचिव, महावितरणचे कार्यकारी संचालक यांच्याविरोधात मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा ...
सिन्नर : ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा सचिव, महावितरणचे कार्यकारी संचालक यांच्याविरोधात मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली.
मनसेचे विधानसभा अध्यक्ष अॅड. दिलीप केदार, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे, महिला तालुकाध्यक्षा अॅड. भाग्यश्री ओझा, शरद घुगे, शिवाजी शिंदे, गोरख जाधव आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. १ ऑगस्टला मनसेच्या शिष्टमंडळाला वीजबिलांमध्ये सूट दिली जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर राऊत यांनी घूमजाव करीत वीजग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नसून मीटर रिडिंगप्रमाणे वीजबिल भरावेच लागेल असे सांगितले. सहा महिन्यांचा घटनाक्रम पाहता ऊर्जामंत्री राऊत यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. ही वीज कंपन्यांशी संगनमत करून जनतेची आर्थिक लूट केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
----------------
सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. (०३ सिन्नर २)
===Photopath===
030221\03nsk_15_03022021_13.jpg
===Caption===
०३ सिन्नर २