फेसबुक अकाउंट हॅक करून फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 03:41 PM2021-05-16T15:41:36+5:302021-05-16T15:42:53+5:30
देवळा : मी आजारी असून हॉस्पिटलमध्ये भरती छालो आहे, उपचारासाठी मला पैशांची गरज आहे, किंवा मला तातडीने पैशांची गरज असून माझ्या खात्यात त्वरित पैसे टाका, असा संदेश फेसबुक प्रोफाइल हॅक करून आपले मित्र आणि नातेवाइकांना येतो. मित्र आणि नातेवाईक त्वरीत दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे टाकतात व नंतर फसवणुक झाल्याचे लक्षात येते. देवळा तालुक्यात अशा प्रकारे सायबर हॅकर्सकडून अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून आतापर्यंत अनेक नागरीकांना मनस्ताप भोगावा लागला आहे.

फेसबुक आयडी हॅक झाल्याचा अनुभव देवळा येथील व्यापारी कौतिक पवार,अतुल आहेर, मुख्याध्यापक चंद्रकांत आहेर, नितिन गुंजाळ आदींना आला आहे. अतुल आहेर यांचे फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या नातेवाईक आणि अनेक मित्रांना संदेश पाठवण्यात आले. अतुल आहेर हे दवाखान्यात ॲडमीट असून त्यांना १० ते २० हजार रूपयांची मदत करा, असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला होता. दुदैवाने त्यांच्या नाशिक मधील एका मित्राने फारशी चौकशी न करता त्वरीत ३ हजार रूपये हॅकर्सने सांगितलेल्या अकाऊंटमध्ये फोन पेनेद्वारे टाकून दिले व नंतर अतुल आहेर यांच्या प्रकृतिची चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले.
दुसऱ्या एका मित्राने ८ हजार रूपये अकाऊंटला टाकले परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांचे पैसे वाचले. नंतर अतुल आहेर यांनी खुलासा केला कि ते हॉस्पीटलमध्ये दाखल नसून त्यांनी फेसबूकवरून कोणतीही मदत मागितलेली नाही. यानंतर त्यांनी एक पोस्ट करून आपल्या मित्रांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
यानंतर आहेर यांनी देवळा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना फेसबुक आयडी लॉग आऊट करून मित्रांना माहिती देण्याचा सल्ला दिला.
प्रतिष्ठित व्यक्तींचे फेसबुक अकाउंट हॅक करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना फेसबुकवरुन विविध कारणे सांगून पैशाची मागणी झाल्यास त्याला कोणीही प्रतिसाद देऊ नका.संबंधित व्यक्तीला फोन करून विचारूनच पैशाचा व्यवहार करा. माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर मी सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार दिली आहे.
- कौतिक पवार,व्यापारी,देवळा.
माझे अकाउंट हॅक झाल्याची बाब मित्रांना समजल्यामुळे हॅकरने केलेल्या पैशांच्या मागणीला कोणीही प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी हॅकरने बनावट व्हाटस अप अकाउंटला माझा फोटो डिपीला लाऊन पुन्हा एका मित्राकडे पैशाची मागणी केली, परंतु मित्राला घडलेल्या प्रकाराची कल्पना असल्यामुळे फसवणुक टळली. पैसे पाठवतांना योग्य ती खबरदारी घ्यावी.
- अतुल आहेर ( शेतकरी, देवळा ) (१६ फेसबुक)