वाईन विक्रीमध्ये अफरातफर; ४० लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 01:28 AM2022-02-14T01:28:27+5:302022-02-14T01:28:57+5:30
सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स नावाच्या दुकानात विक्री केलेल्या मालाच्या संगणकीय नोंदीमध्ये फेरफार करीत तिघा कर्मचाऱ्यांकडून चाळीस लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. येथील प्रीतमदास सुखवानी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
नाशिकरोड : सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स नावाच्या दुकानात विक्री केलेल्या मालाच्या संगणकीय नोंदीमध्ये फेरफार करीत तिघा कर्मचाऱ्यांकडून चाळीस लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. येथील प्रीतमदास सुखवानी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
१ जुलै २०१८ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स दुकानात संशयित अविनाश अनिल खैरनार (रा. म्हसरूळ), मुसा अब्दुल शेख (रा. सिन्नर फाटा) व अनिता अनिल खैरनार (रा. शांतिनगर, रामकृष्ण नगर) यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी दुकानातून विक्री केलेल्या मालाबाबत संगणकाच्या नोंदणीत फेरफार करून ते खरे असल्याचे भासविले. त्यांनी ४० लाख ८ हजार ४८३ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामधून मिळालेली रक्कम अनिता अनिल खैरनार यांच्या गृह कर्जाचे हप्ते मुदतपूर्व भरणा करून फसवणूक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अविनाश खैरनार व मुसा शेख यांना अटक करण्यात आली आहे.