फसवणूक : बनावट कागदपत्रांद्वारे भुखंड बळकावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 02:31 PM2020-07-29T14:31:54+5:302020-07-29T14:32:13+5:30
संशयितांनी वाणी यांचे आधार व पॅनकार्डच्या छायाचित्रांचा वापर करत बनावट कागदपत्रांच्याअधारे भुखंडमालक वाणी असल्याचे भासवून स्वत:ला जागामालक दाखवून
नाशिक : बनावट मुखत्यारपत्र व अन्य कागदपत्रांचा आधार घेत भामट्यांनी २१८ चौरसमीटरचा भुखंड बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित इमरान अय्युब तांबोळी (पंचशीलनगर) व समाधान दिलीप सोनवणे (रा. देवळ, जि. जळगाव) या दोघांनी मिळून गंगापूर शिवारातील सर्व्हे क्रमांक ५८मधील ८२ क्रमांकाचा २७८ चौरसमिटरचा भुखंड परस्पररित्या हडप केल्याचे भालचंद्र वनजी वाणी (रा.इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
संशयितांनी वाणी यांचे आधार व पॅनकार्डच्या छायाचित्रांचा वापर करत बनावट कागदपत्रांच्याअधारे भुखंडमालक वाणी असल्याचे भासवून स्वत:ला जागामालक दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे दुय्यम निबंधकांकडे विशेष मुखत्यारपत्र तयार करून भुखंड बळकावत फसवणूक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक पाटील करत आहेत.