खाद्यतेलात पाणी मिसळून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:36 AM2018-07-07T01:36:19+5:302018-07-07T01:36:41+5:30
नाशिक : खाद्यतेलाच्या डब्यांमध्ये पाणी भरून एका एंटरप्रायजेसने किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्सला ४८० डबे विक्री करून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उपनगरमध्ये घडली़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही)विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उपनगर परिसरात कन्हैयालाल गोविंदराम जगवानी हे राहत असून, त्यांचे सिंधी कॉलनीत दीपक किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. २९ जून २०१८ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने दीपक किराणा स्टोअर्सशी कोमल एंटरप्रायजेसच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच मधुर स्वाद कंपनीच्या इंदूर येथील सोयाबीन तेलाचा माल पाठवितो, असे सांगितले. सोयाबीन तेलाचे तब्बल ४८० डबे आम्ही पाठवितो, असे सांगत संशयिताने १ लाख ८० हजार रुपये जगवानी यांच्याकडून घेतले. यानंतर संशयिताने या ४८० तेलाच्या डब्यांमध्ये पाणी टाकून ते पॅक करून जगवानी यांच्या किराणा दुकानात पाठविले.
दरम्यान, जगवानी यांनी हे तेलाचे डबे खोलून पाहिले असता त्यात खाद्यतेलाऐवजी पाणी असल्याचे आढळून आले. या प्रकरणी त्यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठत संशयित नीलेश कठपाल विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़