नांदगावी एक कोटी पंधरा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 10:28 PM2022-04-07T22:28:00+5:302022-04-07T22:28:25+5:30
नांदगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचा वादा करून एक कोटी पंधरा लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात येथील हनुमाननगरमधील सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश सूर्यवंशी याला पोलिसांनी गुरूवारी अटक केली. फिर्यादी चेतन शिवाजी इघे (रा. नांदगाव), व इतर साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून मध्य रेल्वे विभागात तिकीट तपासणीस (टी.सी.) व गेटमन पदावर नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट सही व शिक्के असलेले बनावट नियुक्ती पत्र, वैद्यकीय तपासणीचा फार्स करून बनावट मेडिकल सर्टिफिकेट देऊन फिर्यादी व इतरांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी व साक्षीदार हे रेल्वे व इतर भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ज्ञानेश नथू सूर्यवंशी, (रा.पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव) याचे हनुमाननगर नांदगाव येथे असलेल्या सायबर कॅफेवर जात असे. त्यावेळी आरोपी ज्ञानेश सूर्यवंशी याने फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म कशाला भरता.... मी तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीस लावतो, असे सांगून टी.सी. पदासाठी १५ लाख रुपये व गेटमन पदासाठी १२ लाख रुपये लागतील, असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांची यातील सहआरोपी सतीश गुंडू बुच्चे (रा. घर नं. ९, सद्गुरू हाईटस्, पुणे, ता. जि. पुणे), संतोष शंकरराव पाटील (रा. वंडरसिटी, कात्रज, ता. जि. पुणे) यांचेशी ओळख करून दिली. त्यानंतर आरोपींनी बनावट सही व शिक्के असलेले नियुक्ती पत्र व सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, मुंबई , बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई आणि राणी मुखर्जी हॉस्पिटल उत्तर रेल्वे दिल्ली या ठिकाणी मेडिकल झाले. त्याबाबतचे बनावट सही व शिक्के असलेले मेडिकल सर्टिफिकेट देऊन यातील फिर्यादी व साक्षीदारांचेकडून रक्कम घेतल्याची फिर्याद आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनांनुसार नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि ईश्वर पाटील, पोहवा भारत कांदळकर, पोना अनिल शेरेकर, सुनील कुऱ्हाडे, सागर कुमावत, पोकॉ संदीप मुंढे यांचे पथकाने सदर कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.