देणगीच्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून वृद्ध ज्योतिषाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:43 PM2018-10-20T14:43:23+5:302018-10-20T14:43:33+5:30

नाशिक : देणगीसाठी दिलेल्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून भविष्य सांगणाऱ्या वृद्ध ज्योतिषाची सोन्याची चैन फसवणूक करून लांबविल्याची घटना मखमलाबाद गावाजवळील वेदांत ज्योतिष कार्यालयात बुधवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़

 The fraud of old astrology by telling the donation money to be of gold | देणगीच्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून वृद्ध ज्योतिषाची फसवणूक

देणगीच्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून वृद्ध ज्योतिषाची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देमखमलाबाद गावाजवळील ज्योतिष कार्यालयात घटना ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक : देणगीसाठी दिलेल्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून भविष्य सांगणाऱ्या वृद्ध ज्योतिषाची सोन्याची चैन फसवणूक करून लांबविल्याची घटना मखमलाबाद गावाजवळील वेदांत ज्योतिष कार्यालयात बुधवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़

म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप नारायण पुराणिक (६३, रा़ घाडगे मळा, म्हसरूळ) हे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मखमलाबाद बसस्थानकाजवळील ज्योतिष कार्यालयात बसलेले होते़ यावेळी निळ्या रंगाचा शर्ट घातलेला संशयित कार्यालयात आला, त्याच्या हातात निळ्या रंगाची पिशवी होती़ त्याने साईबाबा मंदिरात अकराशे रुपये देणगी द्यावयाची आहे असे सांगून या पैशांना पुराणिक यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लावण्यास सांगितली़ पुराणिक यांनी सोन्याची चैन या पैशांना लावल्यानंतर संशयित इसमाने हातचलाखी करून सोन्याची चैन लांबविली़

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  The fraud of old astrology by telling the donation money to be of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.