बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट खरेदीदाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:45 PM2020-10-26T15:45:52+5:302020-10-26T15:45:52+5:30
पंचवटी : मूळ जमीन मालकाचे बनावट मतदान कार्ड व पॅन कार्ड बनवून प्लॉट नोंदणी करण्यासाठी बनावट मूळ मालक उभा करून तक्रार दाराकडून 16 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणूक प्रकरणी स्वामीनारायण नगर येथील नरेंद्र विजय सिंग यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
मालेगाव कॅम्प येथील प्रकाश एकनाथ चौधरी यांचा प्लॉट असून उंटवाडी शिवशक्ती चौक येथिल संशयित आरोपी राजेंद्र पंडित जगताप, मूळ मालक चौधरी यांच्या नावाने नोंदणी करिता उभा केलेला संशयित व शरणपूररोड शासकीय वसाहत टिळकवाडी येथे राहणारा मंगेश रामदास अहिरे संशयितांनी काही दिवसांपूर्वी प्लॉटचे मूळ मालक चौधरी यांच्या नावाचे बनावट पॅन कार्ड तसेच मतदानकार्ड बनवून फिर्यादी नरेंद्र सिंग यांच्याकडून सोळा लाख रुपये प्लॉट नोंदणी करण्यासाठी एक तोतया संशयित व्यक्ती उभा केला व प्लॉटची विक्री केली. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी राजेंद्र जगताप याला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने
चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर गुन्ह्यातील संशयितांविरुद्ध मुंबई नाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून शहरातील आणखी काही नागरिकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.