महिलेकडून दोन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:05 AM2020-09-20T01:05:48+5:302020-09-20T01:06:08+5:30
भाडेकरू असताना मालमत्तेचा करार करून एका महिलेने एकाला दोन लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : भाडेकरू असताना मालमत्तेचा करार करून एका महिलेने एकाला दोन लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूबीना अख्तर सय्यद (रा. विनोद चेंबर्स, नाशिकरोड) असे संशयित महिलेचे नाव आहे. राजू शेख (रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) यांनी तक्रार दाखल केली. संशयित महिलेच्या मालकीची वडाळा रोडवरील मदार अपार्टमेंटमध्ये सदनिका असून, ती भाडेतत्त्वावर दिलेली आहे.
या सदनिकेत भाडेकरू असतानाही रूबीना यांनी शेख यांच्याशी करार करून त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. ही घटना ९ आॅगस्ट रोजी घडली.
महिना उलटूनही महिलेने पैसे अथवा फ्लॅटचा ताबा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.