ओळखपत्राच्या नावाने ज्येष्ठांची फसवणूक

By admin | Published: August 31, 2016 10:21 PM2016-08-31T22:21:12+5:302016-08-31T22:22:12+5:30

ओळखपत्राच्या नावाने ज्येष्ठांची फसवणूक

The fraud of senior citizens in the name of the identity card | ओळखपत्राच्या नावाने ज्येष्ठांची फसवणूक

ओळखपत्राच्या नावाने ज्येष्ठांची फसवणूक

Next

बागलाण : तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; शासनाच्या योजनेची एैसीतैशीसटाणा : ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र तयार करून देतो म्हणून ग्रामीण भागातील शेकडो लोकांना गंडा घालणाऱ्या चाळीसगाव येथील
तरुणाला कठोर शासन करून ज्येष्ठ नागरिकांचे पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील विविध गावातील सुमारे सहाशे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तहसीलदार सुनील सौंदाणे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
गेल्या दोन वर्षांपूर्वी बागलाण तहसीलदारांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन व चाळीसगाव येथील डिग्नटी फाउण्डेशन संचलित कुलस्वामिनी बहुमंडळ यांनी ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र तयार करण्याची योजना सुरू केली होती. कुलस्वामिनी बहुमंडळचे सचिव रविराज पाटील याने बागलाण तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांना दीडशे रुपयांत ओळखपत्र काढून देण्याचे अमिष दाखविले मात्र दोन वर्ष उलटूनही कोणालाही अद्याप ओळखपत्र मिळालेले नाही. यावेळी नागरिकांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. याप्रसंगी पंडित मोरे, सुरेश बोरसे, गंगाधर गोसावी, अंबादास जगताप, रविराज पाटील, खंडेराव देवरे, नारायण मोरे, देवीदास अनारे, लियाकत पठाण, वसंत खैरनार, चंद्रकांत शेवाळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The fraud of senior citizens in the name of the identity card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.