सोशल साईटस‌्वरुन फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:03 PM2020-12-16T16:03:22+5:302020-12-16T16:03:49+5:30

वाढते प्रकार : सावधानता बाळगण्याचे आवाहन

Fraud from social sites; Awareness from Lasalgaon Police | सोशल साईटस‌्वरुन फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

सोशल साईटस‌्वरुन फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

Next
ठळक मुद्देहनी ट्रॅप मध्ये अडकवत लुटण्याचे प्रकार ग्रामीण भागात


लासलगाव : सोशल साईटस‌्वरून आर्थिक फसवणुकीबरोबरच फेक अकाऊंटच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे प्रकार वाढू लागल्याने लासलगाव पोलिसांनी यबाबत जनजागृती अभियान सुरु केले असल्याची माहिती लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे.
सोशल माध्यमाद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार आता ग्रामीण भागातही होऊ लागले आहेत. ओझर येथील एचएएलमध्ये अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानातील गुप्तहेर संघटनेने मिळविल्याचे प्रकरण ताजे आहे. याशिवाय, एजन्सीच्या माध्यमातुन व्यवसायाची संधी आहे असे सांगून नवागतांना फसवण्याची नवी पध्दत समोर आली आहे. विंचुर येथे एका कंपनीच्या एजन्सीचे आमीष दाखवुन ऑनलाईन पध्दतीने रक्कम घेऊन फसवणुक केल्याचे उघड झाले. सदर कंपनीच बनावट असल्याचे लक्षात आल्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. जुन्या वस्तु खरेदीबरोबरच आता थेट पोलिस अधिकारी यांच्या नावाने फेक अकाऊंटचा वापर करून बदली झालेल्या अधिकारी यांच्या मित्र परीवाराकडून उसनी रक्कम ट्रान्सफर करण्याचा प्रकारही विंचुर येथे घडला आहे. कांदा व धान्य व्यापारामुळे लासलगाव ,पिंपळगाव बसवंत व विंचुर भागात कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या भागात फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यासाठीच लासलगाव पोलीसांनी त्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.

 

Web Title: Fraud from social sites; Awareness from Lasalgaon Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.